बेकायदा लॉटरीच्या मुख्यालयाचा छडा

अनिश पाटील
बुधवार, 23 मे 2018

मुंबई - जगभरातील 15 देशांमध्ये जाळे पसरलेल्या "गेम किंग' या बेकायदा ऑनलाइन लॉटरीच्या मुख्यालयाचा छडा लावण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले. या मुख्यालयावर छापा घालून पोलिसांनी मुख्य सूत्रधार आंचल चौरसिया याच्या भावाला अटक केली. ऑपेरा हाउस येथील कार्यालयातून या लॉटरीची सूत्रे हलवली जायची.

पोलिसांनी आचलचा भाऊ आदेश रमेश चौरसिया (वय 22) याच्यासह शुभम ऊर्फ गोलू चौरसिया (30), शिवबाबू चौरसिया (39) आणि राकेश चौरसिया (57) यांना अटक केली. गुन्हे शाखेच्या कक्ष 3 चे पोलिस निरीक्षक जगदीश साईल यांच्या पथकाने ही कारवाई केली. या वेळी संगणक आणि इतर उपकरणेही पोलिसांनी जप्त केली. यापूर्वी गोरेगाव येथील लॉटरी सेंटरवर कारवाई करीत आठ जणांना अटक करण्यात आली होती.

शुभम आणि शिवबाबू ऑपेरा हाउस येथील मुख्यालयातून ऑनलाइन लॉटरीची यंत्रणा चालवायचे. त्याचे पॉइंट व्यवस्थापकांना दिले यायचे. त्यांच्या साह्याने परिसरातील बेकायदा लॉटरी सेंटरना या पॉइंटचे वाटप व्हायचे. त्यासाठी या सेंटरना लॉटरीसाठीचे विशिष्ट सॉफ्टवेअर दिले गेले होते. ते सॉफ्टवेअर लॉग इन आयडीद्वारे सुरू केले जायचे. हेच पॉइंट पुढे ग्राहकांना विकले जायचे. या यंत्रणेत 16 विविध प्रकारच्या लॉटरी होत्या. ग्राहक जिंकला की पॉइंट वाढतात आणि हरला की कमी होतात. शेवटी ग्राहकाच्या खात्यावर जमा झालेल्या पॉइंटनुसार त्यांना ठराविक रक्कम मिळायची.

200 कोटींहून अधिक उलाढाल
बेकायदा लॉटरी प्रकरणातील आरोपी राकेश हा व्यवहारातील सर्व रक्कम गोळा करून मुख्य सूत्रधार आंचल चौरसिया याच्यापर्यंत पोचवायचा. यात 200 कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल होत होती, असा अंदाज वर्तवला जात आहे. या सर्व व्यवहारांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी आंचलचा भाऊ आदेश याच्यावर होती.

Web Title: illegal lottery headquarters crime