बेकायदा पूल ठरतोय धोकादायक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मे 2017

दादर - कॉजवे ते मरोळ जलवाहिनीच्या बोगद्याच्या कामानिमित्त सहा वर्षांपूर्वी पालिकेने तात्पुरत्या स्वरूपात बांधलेला पूल मोडकळीस आला आहे. हा पूल कधीही पडून मोठा अपघात होण्याची शक्‍यता आहे. पालिकेच्या या बेकायदा पुलाचा वापर कॉजवेमधील नागरिक करत असल्याने त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. पुलाचे स्ट्रक्‍चर ऑडिट करून त्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. 

माहीममधील रेतीबंदर आणि मृदुंग आचार्य मैदानाला जोडणारा हा पूल सहा वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता. कॉजवे ते मरोळपर्यंतच्या बोगद्याच्या कामासाठी हा पूल बांधला होता. या पुलाची मर्यादा काही कालावधीसाठीच होती. बोगद्याच्या कामानंतर हा पूल काढण्यात येईल, असे त्या वेळी सांगण्यात आले. विभागातील रहिवासी या बेकायदा पुलाचा वापर करतात. कामानंतर आता या पुलाची मर्यादा संपली. सध्या पुलाचे लोखंडी अँगल गंजले आहेत. छत पडले आहे. बाजूचे पत्रे तुटलेले आहेत. त्यामुळे पुलाची दुरवस्था झाली आहे. स्थानिकांना वापरण्यासाठी पूल धोकादायक आहे. 

पालिकेचा हा बेकायदा पूल कायदेशीर करण्यासाठी मनसेकडून प्रयत्नही करण्यात आले होते. पण त्यात त्यांना यश आले नाही. 

तो पूल तात्पुरता होता. त्याचे स्ट्रक्‍चर ऑडिट करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. पूल वापरण्यालायक असेल तर तो पूल जी उत्तर विभागाच्या ताब्यात घेऊन त्याची डागडुजी करणार आहोत. जर तो सेवा देण्याच्या स्थितीत नसेल तर  पूल काढून टाकू.
- रामकांत बिरादार, सहायक आयुक्त, जी उत्तर विभाग

Web Title: Illegal pool dangerous

टॅग्स