ठाणे, पालघरमध्ये बेकायदा शाळांचे पेव 

ठाणे, पालघरमध्ये बेकायदा शाळांचे पेव 

मुंबई - ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदा शाळा सुरू करण्यात आल्याची माहिती उघडकीस आली आहे. पालघर आणि ठाण्यामध्ये 244 प्राथमिक शाळा बेकायदा सुरू आहेत. या शाळांवर कारवाई करण्याकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. यंदा ठाणे जिल्ह्यात बेकायदा शाळांची संख्या वाढली आहे. 

प्राथमिक शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाची मंजुरी लागते. मात्र खासगी शाळा सुरू करणाऱ्या संस्थांकडून कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता सर्रासपणे शाळा सुरू करण्यात येत आहेत. पालघर जिल्ह्यामध्ये 197 शाळा आजही बेकायदा सुरू आहेत. गेल्या वर्षी बेकायदा शाळांची संख्या 234 होती. शिक्षण संचालनालयाने शाळांना बजावलेल्या कारवाईच्या नोटिशीमुळे या शाळांच्या संख्येत काही प्रमाणात घट झाली असली तरी अनेक शाळा आजही बिनदिक्कतपणे सुरू आहेत. गतवर्षी ठाण्यामध्ये 38 शाळा बेकायदा सुरू होत्या. यामध्ये यंदा वाढ होऊन त्यांची संख्या 47 वर पोहचली आहे. त्यामुळे ठाणे, पालघरमधील 244 शाळांमधील विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. 

दंड वसूल केला जाणार? 
शिक्षण संचालनालयाकडून दरवर्षी बेकायदा शाळांची यादी जाहीर करून त्यांना नोटीस देण्यात येते, तरीही या शाळा बिनदिक्‍कतपणे सुरू आहेत. या शाळा बंद न केल्यास एक लाख इतका दंड वसूल केला जाणार आहे. त्यातूनही शाळा सुरू ठेवल्यास प्रतिदिन 10 हजारांचा दंड आकारला जाईल, अशी नोटीस शाळांना पाठवण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com