बेकायदा टेलिफोन एक्‍स्चेंज उद्‌ध्वस्त

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 एप्रिल 2018

मुंबई - ठाण्यातील दोन ठिकाणी बेकायदा सुरू असलेले टेलिफोन एक्‍स्चेंज दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) उद्‌ध्वस्त केले. याद्वारे आरोपींनी 58 कोटींचा सरकारी महसूल बुडवला आहे. या टेलिफोन एक्‍स्चेंजचा वापर दहशतवादी कारवायांसाठी झाला का, याबाबत एटीएस तपास करत आहे.

विशेष माहितीच्या आधारे एटीएसने 19 एप्रिलला छापे टाकले. त्यातील पहिल्या कारवाईत ठाणे (पश्‍चिम) आझादनगर येथील घरावर छापा टाकण्यात आला. त्या वेळी तेथे बेकायदा टेलिफोन एक्‍स्चेंज सुरू होते. पथकाने या ठिकाणी 139 सीम कार्ड, एक लॅपटॉप, पाच सीम बॉक्‍स मशिन व तीन राउटर असे साहित्य जप्त केले. या प्रकरणी 28 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशातील आझमगड परिसरातील रहिवासी आहे. त्यानंतर आरोपीच्या चौकशीत मुंब्रा परिसरातील त्याच्या आणखी एका घरावरही छापा टाकण्यात आला. त्या ठिकाणी पाच बेकायदा आंतरराष्ट्रीय गेटवे, 95 सीम बॉक्‍स, 3 राउटर व एक लॅपटॉप जप्त करण्यात आला. आरोपी त्याचा भाऊ व अन्य साथीदारांच्या मदतीने हे बेकायदा टेलिफोन एक्‍स्चेंज चालवत होता.

आंतरराष्ट्रीय कॉलसाठी वापर
ठाणे आणि मुंब्रा परिसरात एक ते दीड वर्षापासून हे टेलिफोन एक्‍स्चेंज सुरू होते. आंतरराष्ट्रीय मोबाईल क्रमांक स्थानिक क्रमांकाच्या साह्याने दुसऱ्या क्रमांकांशी जोडण्यात येत होते. या प्रकरणी न्यायालयाने आरोपींना 24 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Web Title: illegal telephone exchange Devastated