RTO अधिकाऱ्याकडूनच बेकायदेशीरपणे वाहनाचा वापर; किरकोळ अपघातानंतर धक्कादायक बाब उघड

RTO अधिकाऱ्याकडूनच बेकायदेशीरपणे वाहनाचा वापर; किरकोळ अपघातानंतर धक्कादायक बाब उघड


मुंबई - अहमदनगर उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून गेल्या चार महिन्यांपासून विनानोंदणी वाहनाचा वापर केल्या जात असल्य़ाचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. विशेष म्हणजे या अधिकाऱ्याच्या वाहनाची गेल्या चार महिन्यांपासून नोंदणीच झाली नाही. त्यामुळे सर्वसामान्यांवर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांकडूनच मोटार वाहन कायद्याची पायमल्ली होत असल्याने त्याच्यावर कारवाई करण्य़ाची मागणी राज्य परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांच्याकडे केली आहे. 

अहमदरनगर येथे शुक्रवारी (ता.1) उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दिपक पाटील आपल्या चारचाकी वाहनाने जात असतांना त्यांच्या वाहनाची दुचाकीला धडक बसली, यावेळी दुचाकीस्वार आणि पाटील यांच्या बाचाबाची झाली. दरम्यान आपल्या गाडीचे कागदपत्र आणि टिसी नंबर असल्याचे पाटील यांनी सांगितले. मात्र, दुचाकीवर नंबर नसल्याने पाटील चांगलेच संतापले. मात्र, यासंपुर्ण प्रकरणानंतर पाटील यांचेच वाहन विनानोंदणी आणि बेकायदा असल्याचा आरोप स्थानिकांमध्ये केला जात आहे. त्याची तक्रार आता, परिवहन आयुक्तांकडे करण्यात आली आहे. 

दिपक पाटील यांच्याकडे असलेल्या नव्या वाहनाच्या खरेदी, नोंदणीच झाली नाही. वाहन सुमारे 8 हजार किलोमीटर वापरण्यात आले आहे. तर रिसेल ओडोमीटरनुसार 4 डिसेंबर रोजी वाहनाची सर्व्हिसिंग झाली आहे. त्यामूळे या वाहनांमध्ये असलेल्या जिपीआरएस आणि पाटील यांच्या मोबाईलचे लोकेशनची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी तक्रारदारांकडून केली जात आहे. याप्रकरणी दिपक पाटील यांची प्रतिक्रीया घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रतिक्रीया मिळू शकली नाही. 

शोरूम मालकावरही प्रश्नचिन्ह

नवीन गाडी घेतांना, पथकर, विमा कवच, आरटीओ शुल्क आणि मोटार वाहन कायद्यातील तरतुदीचे पालन केल्याशिवाय वाहन ग्राहकांना दिल्या जात नाही. मात्र, या प्रकरणात संबंधीत वाहन शोरूम मालकाने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पाटील यांना वाहनाची नोंदणी न करताच वाहन दिल्याचा आरोप केल्या जात आहे. त्यामुळे याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी सुद्धा केली जात आहे. 

शहरामध्ये सर्वसामान्य वाहन चालकांवर विविध कायद्याखाली दंडात्मक, वाहन जप्ती कारवाई केली जाते. मात्र, आरटीओतील अधिकारीच विनानोंदणी वाहन वापरत आहे. यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामूळे पाटील यांच्या वाहनाने झालेल्या अपघाताची आणि बेकायदा वाहनाची आणि सखोल चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
- फिरोज शफी खान, सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमीटी, अल्पसंख्यांक विभाग

अहमदनगर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पाटील यांनी ती गाडी टेस्ट ड्राईव्हसाठी घेतल्याची माहिती दिली आहे. मात्र, या प्रकरणात पाटील दोषी आढळल्यास त्यांच्या कायदेशीर कारवाई करण्यात येईल
- अविनाश ढाकणे,
आयुक्त, राज्य परिवहन विभाग

चालकाने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पाटील यांना वाहनाची नोंदणी न करताच वाहन दिल्याचा आरोप केल्या जात आहे. त्यामुळे याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी सुद्धा केली जात आहे. 

Illegal use of the vehicle by the RTO officer himself Shocking matter revealed after minor accident in ahmednagar

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com