आयएमए डोंबिवलीच्या अध्यक्षपदी डॉ. अर्चना पाटे

संजीत वायंगणकर
मंगळवार, 3 एप्रिल 2018

डोंबिवली - इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) डोंबिवली विभागीय अध्यक्षपदी डॉ. अर्चना पाटे यांची निवड करण्यात आली. रविवारी डोंबिवलीत झालेल्या एका कार्यक्रमात डॉ. निती उपासनी यांच्याकडून त्यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्विकारली.

2018-19 या वर्षांच्या कार्यकाळासाठी ही निवड करण्यात आली आहे. डॉ. पाटे यांच्या अध्यक्षपदाबरोबरच कार्यकारिणी समितीच्या इतर सदस्यांच्या नावांची घोषणाही यावेळी करण्यात आली. त्यानूसार उपाध्यक्षपदी डॉ.उत्कर्ष भिंगारे, सचिवपदी डॉ. वंदना ढाकतोडे, खजिनदारपदी डॉ. सुनीत उपासनी, प्रेसिडेंट इलेक्ट डॉ. मीना पृथी आणि सहसचिवपदी डॉ. भक्ती लोटे यांची निवड करण्यात आली. डोंबिवली आयएमएने यापूर्वी राबविलेले विविध सामाजिक उपक्रम यापूढेही अधिक जोमाने राबवण्याचा आपला प्रयत्न असेल अशी प्रतिक्रिया यावेळी नवनियुक्त अध्यक्षा डॉ. अर्चना पाटे यांनी यावेळी दिली.

दरम्यान वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डोंबिवलीतील नामांकित आणि ज्येष्ठ डॉक्टरांचा या कार्यक्रमात गौरवही करण्यात आला.

Web Title: IMA presidents dr. Archana Pate