पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात अति मुसळधार तर मुंबई ठाण्यात हलका पाऊस बरसण्याची शक्यता

पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात अति मुसळधार तर मुंबई ठाण्यात हलका पाऊस बरसण्याची शक्यता

मुंबई : मुंबई आणि महाराष्ट्रात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. मुख्यत्वे पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग आणि कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

सोबतच ठाणे आणि पालघरमध्ये हलका पाऊस पडणार असं भाकीत हवामान खात्याकडून करण्यात आलंय. कोकणात मुसळधार पावसाचा इशारा दिला गेलाय, तळ कोकणात समुद्राजवळच्या नागरिकांनी अधिक काळजी घेऊन अधिक सतर्कता बाळगावी असंही प्रशासनाकडून सांगण्यात आलंय.

कोल्हापूर, रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पुढील तीन दिवस अति मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असं आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आलंय. 

पुढील तीन दिवस मुंबई, ठाणे, उपनगरे तसेच पालघरमध्ये हलक्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. कालही मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाच्या हलक्या सरी बारसल्यात. त्यामुळे मुंबईत तापमान घसरलं आणि मुंबईत आल्हाददायक वातावरण निर्माण झालेलं.   

काहीच दिवसांपूर्वी स्कायमेटने देखील राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे देशभरात विविध ठिकामी पावसाचा स्कायमेटतर्फे अंदाज व्यक्त करण्यात आला होता. सप्टेंबरच्या २४ तारखेपासून राजस्थानातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होईल असं स्कायमेटने भाकीत व्यक्त केलंय. 

IMD predicts heavy to very heavy rainfall in konkan light rainfall expected in mumbai thane

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com