सौरऊर्जेचे महत्त्व वाढणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

भाईंदर - देशात ऊर्जेचे स्रोत कमी होत असून, आगामी काळात सौरऊर्जेचे महत्त्व वाढणार असल्याचे मत अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले.

भाईंदर - देशात ऊर्जेचे स्रोत कमी होत असून, आगामी काळात सौरऊर्जेचे महत्त्व वाढणार असल्याचे मत अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले.

मिरा-भाईंदर पालिकेतर्फे घेतलेल्या सूर्यकुंभ महोत्सव व महापौर चषक २०१७ च्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. सूर्यकुंभ महोत्सवांतर्गत नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानावर ७,४०० विद्यार्थ्यांनी सौरऊर्जेवरील कुकरद्वारे जेवण करून आस्वाद घेतला. ‘एक कदम ऊर्जा स्वावलंब की ओर’ असा नारा दिलेल्या सूर्यकुंभ महोत्सवाची दखल ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्‌’ने घेतली आहे. त्यामुळे लवकरच हा महोत्सव वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जाणार आहे. या वेळी महापौर गीता जैन, उपमहापौर प्रवीण पाटील, स्थायी समिती सभापती प्रभाकर म्हात्रे उपस्थित होते. डॉ. काकोडकर म्हणाले, सौरऊर्जेचे महत्त्व व गरज लक्षात घेता मिरा-भाईंदर महापालिकेने घरोघरी सौरऊर्जेचा संदेश पोहचविण्याच्या उद्देशाने उचललेले पाऊल क्रांतिकारक ठरावे, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, महापौर जैन यांच्या हस्ते कला व क्रीडा स्पर्धांचे उद्‌घाटन झाले. या वेळी विविध क्रीडास्पर्धा झाल्या. महापौर कला व क्रीडा चषकाची सांगता १८ फेब्रुवारीला होणार आहे.

Web Title: The importance of solar energy is growing