'एनआयए'ने पीडितांबाबत भूमिका स्पष्ट करावी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 एप्रिल 2017

मुंबई - मालेगाव बॉंबस्फोटातील पीडितांना सुनावणीमध्ये बाजू मांडण्यास देण्याच्या विशेष न्यायालयाच्या आदेशाबाबत राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयएन) भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले.

बॉंबस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरने केलेल्या याचिकेवर न्या. विजया ताहिलरमानी यांच्या खंडपीठापुढे आज सुनावणी झाली. बॉंबस्फोटात मृत्यू झालेल्या एका तरुणाचे वडील निसार बिलाल यांनी विशेष "एनआयए' न्यायालयात बाजू मांडण्यासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने त्यांचा अर्ज मंजूर केला आहे; परंतु त्याविरोधात साध्वी प्रज्ञा सिंहने उच्च न्यायालयात याचिका केली आहे. याचिकेवर जूनमध्ये सुनावणी होणार आहे. साध्वी प्रज्ञाला दोनच दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.

Web Title: important to explain the role of victims by nia