सिंचन घोटाळ्याच्या 'त्या' बंद केलेल्या फाईल्स बद्दल महत्त्वपूर्ण माहिती..

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

विदर्भातील सिंचन घोटाळ्यातील नऊ फाईल्स आज लाचलुचपत विभागाकडून बंद करण्यात आल्यात. त्यानंतर अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चीट देण्यात आली अश्याप्रकारच्या बातम्या समोर आल्यात. दरम्यान यावर आता ACB म्हणजेच लाचलुचपत विभागाकडून ANI या वृत्तसंस्थेला अधिकृत माहिती दिल्याचं समोर येतंय.  

या प्रकरणानंतर आता लाचलुचपत विभागानंही खुलासा केला आहे. बंद केलेल्या फाईलशी अजित पवारांचा संबंध नाही असं एसीबीनं म्हटलंय. एसीबीचे महासंचालक परमबीर सिंह यांनी ANI या वृत्तसंस्थेला माहिती दिली आहे. फाईल बंद होणं ही रुटीन प्रोसेस आहे असंही त्यांनी सांगितलंय.

मात्र पवारांनी भाजपची साथ दिल्यानंतरच सिंचन घोटाळ्याच्या फाईल कशा बंद झाल्या असा आरोप आता काँग्रेसकडून करण्यात येतोय..

अजित पवार यांनी भाजपला साथ दिल्यानंतर लगेच हा निर्णय आल्याचं पाहायला मिळाल्यानं आता विरोधकांकडून आरोपांचं सत्र सुरु झालं आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला भाजप सरकारवर जोरदार हल्ला केला आहे. भाजपची 'खाओ और खिलाओ' हीच निती असल्याची टीका त्यांनी केलीय.

Webtitle : important information related to nine closed files by ACB in irrigation

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: important information related to nine closed files by ACB in irrigation scam