मोठी बातमी - 'या' साठी मनसेनं आज दुपारी बोलावली पत्रकार परिषद

सकाळ वृत्तसेवा
Friday, 26 June 2020

राज्यात कोरोना व्हायरसनं धुमाकूळ घातला आहे. राज्यासह मुंबईतही कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय.

मुंबई- राज्यात कोरोना व्हायरसनं धुमाकूळ घातला आहे. राज्यासह मुंबईतही कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. तसंच वाढत्या रुग्णांसह मृतांची संख्याही झपाट्यानं वाढतेय. त्यामुळे राज्याती कोरोनाची परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. तसंच मुंबईत व्हायरसचा सर्वाधिक प्रार्दुभाव झालेला आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाची परिस्थिती चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं कोरोनामुळे मृत झालेल्या रुग्णांसाठी वापरण्यात येणाऱ्या शवपिशव्याबाबत गंभीर आरोप केला आहे. यासाठी त्यांनी आज दुपारी पत्रकार परिषद बोलावली आहे.

BIG NEWS लॉकडाऊननंतर काहीशी अशी दिसतील मुंबईतील भाजी मार्केट

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांना ज्या शवपिशव्या वापरण्यात येतात त्यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी गंभीर आरोप केलेत. या पिशव्यांच्या किंमतीमध्ये घोळ झाला असल्याचा आरोप देशपांडे यांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे मुंबईत आज दुपारी पत्रकार परिषद घेणार आहे. त्यामुळे या पत्रकार परिषदेत संदीप देशपांडे नेमकं काय बोलणार आणि कोणावर टीका करणार हे पाहावं लागेल.

शिवसेनेच्या जाहिरातबाजीवर मनसेचा टोला काही दिवसांपूर्वी संदीप देशपांडे यांनी जाहिरातबाजीवरुन ट्विटरवर शिवसेनेला टोला हाणला होता. कुलाबा विधान परिसरात शिवसेनेकडून महिलांसाठी सॅनिटरी पॅड्सचं वाटप करण्यात आलं. शिवसेनेकडून गरजूंसाठी 500 सॅनिटरी नॅपकिन्सची पाकिट वाटण्यात आली. या सॅनिटरी पॅड्सच्या पाकिटावर आदित्य ठाकरेंचा फोटो लावण्यात आला होता.

BIG NEWS 'अर्सेनिक अल्बम 30' गोळ्याबाबत पालिकेकडून नगरसेवकांना सूचना

युवती आणि युवा सेनेकडून या मोफत सॅनिटरी पॅड्सचं वाटप केलं गेलं. त्यावर आदित्य ठाकरे आणि शिवसेना फोटो लावून जाहीरातबाजी केली गेली. यावरुन संदीप देशपांडे यांनी ट्विटरवरून यावर टीका केली आहे. काय रे लाचारानो हे पण आधीच छापले होते का? कशावर कोणाचा फोटो टाकायचा हे कळत नाही ?आता म्हणतील राजकारण नको, असं म्हणत संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: important press conference by MNS to put some light on mumbais corona