"शिवपुत्र संभाजी', "तान्हाजी'ची उत्सवावर छाप 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

रोहा : शिवजयंती उत्सव अवघ्या दोन दिवसांवर आल्याने शिवप्रेमींची बाजारात लगबग वाढली आहे. शोभायात्रेसाठी लागणाऱ्या वेशभूषा व आभूषणे, पताका; तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती बाजारात दाखल झाल्या आहेत. वेशभूषांचे भाडे स्थिर असून मूर्तींच्या किमती 10 ते 20 टक्‍क्‍यांनी वाढल्या आहेत.

रोहा : शिवजयंती उत्सव अवघ्या दोन दिवसांवर आल्याने शिवप्रेमींची बाजारात लगबग वाढली आहे. शोभायात्रेसाठी लागणाऱ्या वेशभूषा व आभूषणे, पताका; तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती बाजारात दाखल झाल्या आहेत. वेशभूषांचे भाडे स्थिर असून मूर्तींच्या किमती 10 ते 20 टक्‍क्‍यांनी वाढल्या आहेत.

या वर्षी "शिवपुत्र संभाजी' महानाट्य; तसेच "तान्हाजी' या चित्रपटाचा जनमानसावर प्रभाव दिसून आला. त्यामुळे जिल्ह्यात निघणाऱ्या ठिकठिकाणच्या शोभायात्रांमध्ये त्यांची वेशभूषा परिधान केलेले शिवभक्त मोठ्या प्रमाणात पाहायला मिळणार आहे.

मोठी बातमी : महापालिकेत ८१० लिपिक पदे भरणार 

रायगड जिल्ह्यात गावोगावी पालखी, शोभायात्रा, मिरवणूक काढून शिवजयंती मोठ्या उत्सवात साजरी केली जाते. त्यासाठी शिवछत्रपती, सरदार, मावळे, पेशवे, जिजाऊ, महाराण्या अशी वेषभूषा, आभूषणे भाड्याने आणली जातात. यासाठी एक दिवसाचे भाडे 200 ते 300 रुपये असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

गेल्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती 130 ते 800 रुपयांदरम्यान होत्या. या वर्षी मूर्तींच्या किमतीत 10 ते 20 टक्के भाववाढ झाली आहे. प्रत्येक व्यावसायिक शिवजयंतीपर्यंत 200 ते 300 मूर्तींची विक्री करतो. त्यांची एकूण उलाढाल 50 लाखाहून अधिक होते.

महत्‍वाची बातमी : २५ फेब्रुवारीपासून भाजपचा सरकारविरोधात एल्‍गार 

वार्षिक उलाढाल लाखोंच्या घरात 
रोहा तालुक्‍यात 3 ते 4 व्यावसायिक वेषभूषा भाड्याने देतात; तर जिल्हाभरात 50 ते 60 व्यावसायिक आहेत. वेशभूषा भाड्याने देण्याच्या व्यवसायाची जिल्ह्यातील वार्षिक उलाढाल 40 ते 50 लाखांच्या घरात होते. शिवजयंतीनिमित्ताने जिल्ह्यात राजस्थानहून पीओपी मूर्तीचे 50 ते 60 व्यावसायिक दाखल झाले आहेत. त्यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणी रस्त्यालगत व्यवसाय थाटला आहे. 

शिवजयंतीसाठी आभूषणे व वेशभूषेसाठी मागणी नोंदवण्यास सुरुवात झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेसोबत शिवपुत्र संभाजी राजे व तानाजी मालुसरे यांच्या वेशभूषेला मोठी मागणी आहे. 
- नेहा शेख व आलिया शेख, मालक, ए-वन फॅन्सी ड्रेस, रोहा 

शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तींना विशेष मागणी असते. गेल्या वर्षीच्या तुलनेत मूर्तींच्या किमतीत 10 ते 20 टक्के वाढ झाली आहे. 
- किशन सोळंकी, मूर्तीविक्रेते 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने निघणाऱ्या शोभायात्रेसाठी वेशभूषा, आभूषणे, पताका यांची खरेदी केली आहे. 
- शंकर वासमाने, अध्यक्ष, युगनिर्माते, शिवप्रतिष्ठान 

 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Impressions on the festival of "Shivputra Sambhaji", "Tanhaji"