पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ कल्याण पूर्वेत उत्स्फूर्त बंद

kalyan
kalyan

कल्याण - दहशतवादी हल्ल्याचा निषेर्धात कल्याण पूर्वमध्ये आज शुक्रवार ता 15 फेब्रुवारी रोजी दुकाने बंद, रिक्षा बंद, निषेध मोर्चा, सभा, श्रद्धाजली अर्पण करत आपला निषेध व्यक्त केला.

काश्मिरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्लाचा तीव्र निषेध करण्यासाठी आज शुक्रवार ता 15 फेब्रुवारी रोजी सकाळ पासून उत्स्फूर्तपणे 

कल्याण पूर्वमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला, यात दुकाने, हॉटेल, रिक्षा बंद ठेवण्यात आली होते तर काही शाळाना सुट्ट्या लवकर देण्यात आल्या तर काही शाळा बंद करण्यात आल्या होत्या.

जागो जागी निषेध मोर्चा काढण्यात आले होते. यात सर्व पक्षीय नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, शाळकरी विद्यार्थी, आमदार, व्यापारी, दुकान चालक, सर्व रिक्षा चालक यांनी सहभाग घेत आपला निषेध व्यक्त केला. यावेळी पाकिस्थान विरोधात घोषणा बाजी देत शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आणि या भ्याड हल्ल्याचे पाकिस्थान आणि दहशतवादीना चोख उत्तर देण्याची मागणी यावेळी नागरिकांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com