मुंबई विद्यापीठाच्या मानांकनात सुधार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

मुंबई - विद्यापीठ स्तरांवर जागतिक मानांकनामध्ये मुंबई विद्यापीठाची कामगिरी कौतुकास्पद झाली आहे. रसायनशास्त्र, रसायन अभियांत्रिकी, मेकॅनिकल अभियांत्रिकी, फार्मसी आणि फार्मेकोलॉजी विषय शिकवण्याच्या पद्धतीमुळे दर्जात वाढ झाली आहे.

‘क्‍यू एस वर्ल्ड’ युनिव्हर्सिटी रॅंकिंग बाय सब्जेक्‍ट या संस्थेकडून दर वर्षी जगातील विविध विद्यापीठातील विषयांची मानांकने तपासली जातात. त्यामध्ये मुंबई विद्यापीठात रसायन विषय शिकवण्याच्या पद्धतीला ४५१ ते ५०० दरम्यान स्थान मिळाले. त्याचप्रमाणे फार्मसी आणि फार्मेकोलॉजीचे २५१ ते ५००, मेकेनिकल इंजिनिअरिंगचे ३५१ ते ४००, रसायन अभियांत्रिकीचे २०१ ते २५० स्थान मिळाले आहे. या मानांकनासाठी तब्बल ४ हजार ४३८ विद्यालयांची नावे स्पर्धेत होती. त्यापैकी ३ हजार ९८ विद्यापीठे पात्र ठरली. 

शेवटच्या टप्प्यात १ हजार ११७ विद्यापीठांतील विषयांना मानांकने मिळाली. या मानांकनाचा तपशील www.topuniversities.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव एम. ए. खान यांनी सांगितले की, विद्यापीठ प्रशासनाने सहा महिन्यांपूर्वी यादीत नाव नोंदवले. तब्बल सहा महिन्यांच्या तपासणीतून अखेर पाच विषयांना जागतिक मानांकन मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

Web Title: Improved rankings University of Mumbai