esakal | मुंबईत समुद्राच्या पाण्यावर तरंगताना आढळला मृतदेह
sakal

बोलून बातमी शोधा

sea

मुंबईत समुद्राच्या पाण्यावर तरंगताना आढळला मृतदेह

sakal_logo
By
सुरज सावंत

मुंबई: मुंबईत काल रात्री ११ च्या सुमारास एका व्यक्तीचा मृतदेह समुद्रात तरंगताना (dead body floating at sea) आढळला. मालाड मालवणी परिसरात (Malad malvani area) समुद्राच्या पाण्यावर (sea water) हा मृतदेह तरंगत होता. स्थानिकांनी (locals) याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. (In mumbai dead body found at malad malvani sea)

बेशुद्ध अवस्थेत असलेल्या व्यक्तीला तातडीने पोलिसांनी जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्या व्यक्तीला तपासल्यानंतर मृत घोषित केले. या मृतदेहाचे शवविच्छेदन करून तो मृतदेह कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा: "सोनिया सेनेचे प्रवक्ते संजय राऊतजी..."; चित्रा वाघ यांची टीका

मृत व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकांचा पोलीस शोध घेत आहेत. मुंबईत दोन दिवसांपासून बेपत्ता झाल्याची संबधित पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे का? ते तपासून ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. ही हत्या आहे, किंवा अन्य काही ते अजून स्पष्ट झालेले नाही.

loading image