मुरबाड नगर पंचायतीच्या स्पर्धा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

मुरबाड (ठाणे) - एमपीएस्सी युपीएस्सी परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी मुरबाडमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उघडण्यात आले आहे. मुरबाड नगर पंचायत संचलित या केंद्राचे उदघाटन बुधवारी 15 ऑगस्ट रोजी आमदार किसन कथोरे यांचे हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार सचिन चौधर, ठाणे जिल्हा भाजपचे अध्यक्ष दयानंद चोरगे, मुरबाड तालुका अध्यक्ष जयवंत सूर्यराव, ठाणे जिल्हा परिषदेचे सदस्य सुभाष घरत, उल्हास बांगर, मुरबाड पंचायत समितीचे सभापती जनार्दन पादिर, उपसभापती सिमा घरत, मुरबाडच्या नगराध्यक्ष शीतल तोंडलीकर, उपनगराध्यक्ष अर्चना विशे, मुख्याधिकारी पंकज भुसे उपस्थित होते

या कार्यक्रमाच्या वेळी मुरबाड तालुक्यातून एमपीएस्सी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या भाग्यश्री आवार (सहायक मोटार निरीक्षक), अपर्णा कंटे, (सहाय्यक अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण), स्वाती पादिर (विक्रीकर निरीक्षक), सागर भोईर मंत्रालय कायदे विभाग अर्थशास्र विषयात पीएचडी पदवी मिळविलेले प्रमोद पोगेरे यांचा सत्कार करण्यात आला

कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे मुख्य समनवयक नितीन मोहोपे यांनी केले सुत्रसंचलन यशवंत माळी यांनी तर आभार प्रदर्शन संजय ठाकरे यांनी केले

Web Title: Inauguration of Murbad Nagar Panchayat Competitive Guidance Center