मुंबईत मतदान कर्मचा-यांची गैरसोय

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

सदरचे छायाचित्र हे कुठल्या खेडेगावातील नसुन १७९-सायन कोळीवाडा विधानसभा (२४२ ते २५७) या मतदारसंघातील आहे.

मुंबई : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. संपूर्ण राज्यभरात मतदान कर्मचारी आणि पोलिस मतदान सुरळीत चालावे यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र वरील छायाचित्रातील परिस्थिती पाहता काही मतदान कर्मचा-यांची निवडणूक आयोगाकडून कशी गैरसोय होते याचा प्रत्यय येतो. वरील छाया चित्र हे कुठल्या खेडेगावातील नसुन १७९-सायन कोळीवाडा विधानसभा (२४२ ते २५७) या मतदारसंघातील आहे.

निवडणूकीसाठी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली मुंबई निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदारांच्या सोयीसाठी खास आरोग्य कक्ष, दिव्यांग मदत कक्ष, बालसंगोपन कक्ष उभारले आहेत. मात्र त्याठिकाणी आरोग्य सहाय्यक व आरोग्यसेविकांची सोय चिखलात केली गेली आहे. या सर्व प्रकाराची निवडणूक अधिकारी, झोनल ऑफिसर यांच्याकडे अनेकदा व्यथा मांडूनही कोणीही त्यांची मदत केलेली नाही. 

त्यामुळे, मुंबई शहरातील निवडणूक मतदान केंद्रावर जर अशी भयानक परिस्थिती असेल तर मुंबईबाहेर गावखेड्यातील वैद्यकीय सहाय्यक आणि आरोग्यसेविकांची काय अवस्था असेल याची निवडणूक आयोगाने दखल घ्यायला हवी अशी मागणी या राज्यातील मतदान कर्मचा-यांकडून केली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inconvenience of polling staff in Mumbai city