मध्य रेल्वेवर फुकट्या प्रवाशांच्या संख्येत वाढ 

मध्य रेल्वेवर फुकट्या प्रवाशांच्या संख्येत वाढ 

मुंबई : मुंबईची लाईफलाईन असणा-या लोकलसेवेचा दरदिवशी लाखो प्रवासी लाभ घेत असतात. मात्र यापैकी अनेकजण तिकिट न काढताच प्रवास करत असतात. पश्‍चिम, मध्य आणि हार्बर अशा तिन्ही रेल्वेवर अशा फुकट प्रवास करणा-यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून यात सर्वाधिक फुकटे प्रवासी मध्य रेल्वेवर आहेत.

दरम्यान ऑक्‍टोबर महिन्यात अशा फुकट्या प्रवाशांवर करण्यात आलेल्या कारवाईतून तब्बल 22 कोटी 87 लाखांचा दंड वसुल करण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या 10 कोटीने वाढली असून मागच्या ऑक्‍टोबर महिन्यात 13 कोटी 42 लाखांचा दंड आकारण्यात आला होता. 

ऑक्‍टोबर महिन्यात मध्य रेल्वेवर विनातिकिट प्रवास करण्याच्या 4 लाख 5 हजार गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. मागील वर्षीच्या ऑक्‍टोबरमध्ये हीच संख्या 2 लाख 80 हजार होती. त्यामध्ये 51 टक्‍यांनी वाढ झालेली आहे. एप्रिल ते ऑक्‍टोबर 19 या कालावधीत मध्य रेल्वेवर एकूण 24 लाख 4 हजार प्रकरणांची नोंद आहे. त्यातून 126 कोटी 67 लाखांचा दंड वसुल करण्यात आलेला आहे. तसेच स्वत:चे आरक्षित तिकिट दुसऱ्याला देणाऱ्या 695 प्रकरणांमधून 5 लाख 60 हजारांचा दंड आकारण्यात आला आहे.

दिवाळी-छट पुजेदरम्यान सर्वाधिक फुकटे मध्य रेल्वेवर पकडले गेले असून 21 ऑक्‍टोबर ते 1 नोव्हेंबर दरम्यान फुकट्या प्रवाशांविरोधात विशेष मोहीम राबविली गेली होती. त्यामध्ये 13 कोटी 94 लाखांचा दंड वसुल करण्यात आला आहे. या कालावधीत 2 लाख 40 हजार 754 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. गेल्या वर्षी 1 ते 12 नोव्हेंबर दिवाळी कालावधीत 1 लाख 99 हजार 812 प्रकरणांमधून 11 कोटी68 लाख रुपये दंड जमा करण्यात आला होता.  

web title : Increase in number of freight passengers on Central Railway

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com