मुंबई : रेल्वेच्या ट्रेस पासिंगमूळे अपघाती मृत्युच्या संख्येत वाढ

मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयांच्या हद्दीत सर्वाधीक मृत्यु ट्रेस पासिंगमूळे होत असल्याचे जिआरपीच्या दैनंदिन आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.
Mumbai Railway
Mumbai Railwaysakal
Summary

मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयांच्या हद्दीत सर्वाधीक मृत्यु ट्रेस पासिंगमूळे होत असल्याचे जिआरपीच्या दैनंदिन आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.

मुंबई - मुंबई रेल्वे (Mumbai Railway) पोलीस आयुक्तालयांच्या हद्दीत सर्वाधीक मृत्यु (Death) ट्रेस पासिंगमूळे (Trace Passing) होत असल्याचे जिआरपीच्या दैनंदिन आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. रविवारी (ता.15) रोजी मध्य रेल्वे मार्गावर विविध कारणामूळे एकूण 6 मृत्यु झाले, त्यापैकी 5 मृत्यु रेल्वेच्या ट्रेस पासिंगमूळे झाले आहे. यामध्ये कल्याण मध्ये दोन अपघाती मृत्यु झाले असून, सीएसएमटी, ठाणे, वसई मध्ये प्रत्येकी एक अपघाती मृत्युची नोंद रेल्वे पोलीस आयुक्तालयात झाली आहे.

रेल्वे पोलीस आयुक्त कार्यालयाकडून दैनंदिन गुन्ह्यांची नोंद केली जात असून. त्यामध्ये रेल्वे अपघात आणि रेल्वे परिसरात घडणाऱ्या गुन्ह्यांची नोंद ठेवली जाते. त्यामध्ये 15 मे रोजी विविध प्रकारचे 15 गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी 3 गुन्हे उघड झाले आहे. यामध्ये जबरीने मोबाईल खेचून चोरी, चैन स्नॅचिंग, बँग चोरी, पर्स पॅकेट चोरी, अपहरण आणि चोरीचा प्रयत्न अशा प्रकारचे गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

मात्र यामध्ये विविध ठिकाणी रेल्वेने झालेल्या अपघाती मृत्युची आकडेवारी लक्ष वेधून घेत आहे. रविवारी मध्य रेल्वे मार्गावर एकूण 6 अपघाती मृत्यु झाले त्यापैकी एक लोकल मधून चक्कर येऊन पडल्याने झाला आहे. तर इतर पाच मृत्यु ट्रेस पासिंग करतांना झाल्याची माहिती रेल्वे महामार्ग पोलीसांनी दिली आहे. शिवाय 6 मृत्युपैकी 2 मृतकांची ओळख पटली असून, 4 मृतकांची ओळख अद्याप पटली नसल्याचे रेल्वे महामार्ग पोलीसांनी सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com