गणपती पाड्यातील नाला तुंबल्याने डासांच्या प्रमाणात वाढ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

नवी मुंबई पालिकेच्या प्रभाग क्रमांक तीनमधील गणपती पाडा या भागातील पेट्रोल पंपासमोर असणाऱ्या नाल्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. या कामामुळे नैसर्गिकरीत्या असणाऱ्या नाल्याचे पाणी थांबवण्यात आले आहे. या साचलेल्या पाण्यामुळे त्या ठिकाणी डबके झाले आहे. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढले असल्याने, येथील रहिवासी त्रस्त झाले आहेत. 

नवी मुंबई : नवी मुंबई पालिकेच्या प्रभाग क्रमांक तीनमधील गणपती पाडा या भागातील पेट्रोल पंपासमोर असणाऱ्या नाल्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. या कामामुळे नैसर्गिकरीत्या असणाऱ्या नाल्याचे पाणी थांबवण्यात आले आहे. या साचलेल्या पाण्यामुळे त्या ठिकाणी डबके झाले आहे. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढले असल्याने, येथील रहिवासी त्रस्त झाले आहेत. 

पारसिकच्या डोंगरामधून ठाण्याच्या खाडीला जोडणारा हा मुख्य नाला आहे. या नाल्यात वाघोबानगर, सावित्रीनगर व गणपती पाडा या परिसरातील सांडपाणी वाहून नेले जाते. मात्र मागील पाच महिन्यांपासून गणपती पाडा या परिसरात नाल्यावर स्लॅब टाकण्याचे काम सुरू आहे. पाणी थांबवण्यात आल्याने या ठिकाणी डासांचे प्रमाण वाढले असून, रोगराई पसरण्याची शक्‍यता देखील व्यक्त केली जात आहे. या संदर्भात स्वच्छता अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.नाल्यात साचत असणाऱ्या सांडपाण्यामुळे डासांची पैदास वाढली  आहे. रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. 

नाल्याच्या दुरुस्तीचे काम पावसामुळे बंद करण्यात आले असून, पाणी अडवून काम करण्यात येत नाही. जर नाल्यामध्ये पाणी साचत असल्यास हा साफसफाईचा प्रश्न आहे.
-अजय पाटील, उपअभियंता, दिघा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An increase in the proportion of mosquitoes by tilting the drain in Ganapati padda