राज्यातील धरणांच्या सुरक्षेची गुणवत्ता वाढणार

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

मुंबई - धरणांची सुरक्षा, भूकंप मापक उपकरणे, पाण्याचा प्रवाह मोजण्याची यंत्रे आदींची गुणवत्ता पारखून त्यांची खरेदी करण्यासाठी तांत्रिक समिती स्थापन करण्यात आल्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे यापुढे राज्यातील धरणांच्या सुरक्षेच्या गुणवत्तेत वाढ होणार आहे.

राज्यात कोयना, गोसी खुर्द, जायकवाडी यांसारखी मोठी धरणे आहेत. कोयना धरण परिसरात विद्युतनिर्मिती केली जाते. या ठिकाणी सुरक्षा महत्त्वाची आहे. याकरिता जलसंपदा विभाग काही उपकरणांची खरेदी वारंवार करीत असते. त्याचबरोबर भूकंपमापक उपकरणेही महत्त्वाची असतात. यामुळे भूकंपाची पूर्वसूचना मिळते. तसेच जलाशयातील पाण्याच्या साठ्याचा प्रवेग तपासणे. यासाठी बदलत्या परिस्थितीत आधुनिक उपकरणे खरेदी करणे जलसंपदा विभागाला अपरिहार्य आहे. मात्र, यापूर्वी ही खरेदी करताना या विषयातील जाणकारांची तांत्रिक समितीची शिफारस घेतली जात नव्हती. कारण अशा प्रकारची तांत्रिक समिती यापूर्वी नव्हती. यामुळे खरेदी केलेल्या उपकरणाच्या गुणवत्तेबद्दल प्रश्‍नचिन्ह निर्माण झाल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत.

ही बाब विचारात घेऊन यापुढे या तांत्रिक समितीच्या शिफारशीनंतरच अशी उपकरणे खरेदी केली जाणार आहेत. ही समिती तांत्रिक अचूकता, कामगिरी, विक्रीपश्‍चात सेवा, हमी कालावधी, किमान देखभाल व दुरुस्ती या बाबी विचारात घेऊन या उपकरणांची तांत्रिक गुणवत्ता मोजून खरेदीची शिफारस करण्यात येणार आहे.

Web Title: Increase the quality of the state security dams