घोडबंदरसाठी वाढीव पादचारी पूल ; एमएमआरडीएची तयारी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 जून 2018

एमएआरडीएच्या वतीने भविष्यात सुरू होणाऱ्या मेट्रोला अडथळा येणार नाही, अशाप्रकारचे पादचारी पूल उभारणीच्या कामाला परवानगी देता येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

ठाणे : मोठ्या प्रमाणात वाहतुकीसाठी प्रसिद्ध असलेल्या घोडबंदरवर सहा पादचारी पूल उभारले जाणार आहेत. या रस्त्यावर अनेक ठिकाणी रस्ता ओलांडता येत नसल्याने अपघात घडत असतात. त्यावर उपाय म्हणून या रस्त्यावर महत्त्वाच्या ठिकाणी पाच पादचारी पूल उभारण्याची तयारी एमएमआरडीएने दाखवली आहे. 

यापूर्वी एमएमआरडीएकडून महापालिकेला ब्रम्हांड जंक्‍शन आणि कांचनपुष्पा सोसायटी येथे पादचारी पूल उभारणीसाठी महापालिकेला परवानगी देण्यात आली आहे. याचबरोबर कासारवडवली, ओवळा, भाईंदरपाडा आणि गायमुख या ठिकाणी पादचारी पूल उभारण्याची मागणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली होती. त्याबाबतचा पत्रव्यवहार त्यांनी एमएमआरडीकडे केला होता. त्याला उत्तर देताना एमएआरडीएच्या वतीने भविष्यात सुरू होणाऱ्या मेट्रोला अडथळा येणार नाही, अशाप्रकारचे पादचारी पूल उभारणीच्या कामाला परवानगी देता येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्याकडून यापूर्वी मंजूर झालेल्या दोन पुलानंतर इतर चार पूल नक्की कोणत्या जागेत उभारायचे आहेत, त्याचे नकाशे महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून तयार करून घेण्यास सांगण्यात आले आहे. हे नकाशे उपलब्ध झाल्यानंतर पादचारी पुलांसाठी परवानगी देण्याची तयारी एमएमआरडीएच्या वतीने दर्शविण्यात आली आहे. पादचारी पूल उभारले गेल्यास वेगाने गाड्या धावणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर रस्ता ओलांडणे नागरिकांसाठी सुलभ होणार आहे. 

Web Title: Increased pedestrian pool for ghodbandar Preparations for MMRDA