ठाणे जिल्ह्यातील स्थानिक संस्थांना वाढीव पाणी!

बारवी धरणाचे संग्रहित छायाचित्र.
बारवी धरणाचे संग्रहित छायाचित्र.

ठाणे : पाण्याची वाढती मागणी आणि जिल्ह्यावर कोसळलेले पाणीकपातीचे संकट पाहता राज्य सरकारने औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) बारवी धरणात अतिरिक्त पाणीसाठा करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार यंदा बारवी धरणात अतिरिक्त पाणीसाठा करण्यात येत असून आजच्या घडीला हे धरण अतिरिक्त क्षमतेनुसार ७५ टक्के भरले आहे. धरण पूर्णतः भरल्यास स्थानिक संस्थांना वाढीव पाणी मिळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

ठाणे जिल्ह्याला बारवी आणि आंध्र धरणातून पाणीपुरवठा होतो. मागील वर्षी बारवी धरण शंभर टक्के भरूनही ३० तास पाणीकपात करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली होती. पाण्याच्या वाढत्या मागणीमुळे प्राधिकरण संस्था मंजूर कोट्यापेक्षा जास्त पाणी उचलत आहेत. जिल्ह्याची तहान भागविण्यासाठी एमआयडीसीतर्फे बारवी धरणाची उंची वाढवण्याचे काम दोन दशके सुरू होते. पुनर्वसनाचे काम शिल्लक असल्याने धरणात अतिरिक्त पाणीसाठा करता येत नव्हता. यामुळे डिसेंबर महिन्यात राज्य सरकारने एमआयडीसीला पावसाळ्यापूर्वी प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न मार्गी लावून कोणत्याही परिस्थितीत यंदा अतिरिक्त पाणीसाठा करण्याचे आदेश दिले होते. 

एमआयडीसीने प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील प्रत्येकी एकाला पालिकेत नोकरी, त्यांचे पुनर्वसन करीत प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविले आहेत. सद्यस्थितीत बारवी धरणाची उंची चार मीटरने वाढवली असून आता बारवी धरणाची उंची ७२.६० मीटर झाली आहे. धरणात आता ३४०.४८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. वाढीव उंचीनुसार सध्या धरण ७५.५५ टक्के भरले आहे. 

वाढीव साठ्यातून पाणीवाटपाचे आदेश
बारवी धरणाचे उंची वाढविण्याचे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा असल्याने सप्टेंबरमध्ये सरकारने अध्यादेश काढत बारवीचे काम पूर्ण झाल्यानंतर होणारा अतिरिक्त पाणीसाठा लक्षात घेऊन त्यानुसार प्राधिकरणांना वाढीव पाणीवाटप करून दिलेले आहे. वाढीव पाणीसाठ्यातून १३३.०७ द.ल.घ.मी. पाणीवाटप स्थानिक स्वराज्य संस्थांना करण्याचे आदेश राज्याच्या जलसंपदा विभागाने दिले असून प्राधिकरण संस्थांना पाणी कोटाही वाटून दिला आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com