भिवंडी आगारातर्फे मुलींसाठी स्वतंत्र बस

 दीपक हिरे
सोमवार, 10 डिसेंबर 2018

वज्रेश्वरी - महाराष्ट्र शासनाने 12 वी पर्यन्तच्या शालेय विद्यार्थिनींना एसटीचा मोफत प्रवास योजनेची नुकतीच घोषणा केली आहे. त्या अनुषंगाने अनुलोम शासकीय संस्था, शाळा व्यवथापन याच्या सततच्या पाठपुरावामुळे आज भिवंडी आगारा तर्फे मुलींसाठी स्वतंत्र एसटी सोडण्यात आली. त्यावेळी कन्या विद्यालयाच्या विदयार्थीनिंनी औक्षण ओवाळून एसटी बसचे स्वागत केले. तसेच चालक व वाहक यांना पुष्पगुच्छ दिले. 

भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी येथील कन्या विद्यालयातील असंख्य विद्यार्थीनींची शाळा सुटल्यावर जवळपास सर्वच विद्यार्थीनींना त्यांच्या घरी पोहचायला अंदाजे दुपारचे ४ वाजतात. सकाळी 5 वाजता लवकर उठून सकाळच्या 7 वाजता वर्गात उपस्थित राहणे आणि दुपारी 12.30 नंतर शाळा सुटण्याच्या वेळेस घरी परतांना दोन तीन तास बसची वाट पहावी लागते. तसेच मुख्य रस्त्यावर उतरून आपल्या घरी जाण्यास पुन्हा अर्धा तास लागत असल्याने या शालेय विद्यार्थीनिंची खूपच गैरसोय होत होती.

विद्यार्थीनींचे होणारे शैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन, अनुलोमचे संतोष भोईर यांनी या बाबतीत भिवंडी एसटी डेपोच्या मॅनेजर साहेब गणेश राठोड यांच्याशी संपर्क साधला. विद्यालयाचे प्राचार्य सौ. सुरेखा महाजन मॅडम यांचा व एसटी डेपो मॅनेजर साहेबांशी समन्वय साधून, चर्चा करून, आज पासून दुपार 12:30 दरम्यान बस सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल आज सर्व विद्यार्थीनी व कन्या विद्यालयात प्राचार्य शालेय व्यवथापन चे रामू नाईक, तसेच डीएल पाटील, पी डी निकम, जी एल वाघमारे, पी एम वसईकर, वानखेडे मॅडम, आदींच्या उपस्थित उदघाटन सोहळा पार पडला.

यावेळी एसटी महामंडळाचे तसेच एसटीच्या वाहक-चालक यांचे गुलाबपुष्प व शाल श्रीफळ देऊन त्यांचे व अनुलोमच्या कार्यप्रणालीचे कौतुक करून धन्यवाद व्यक्त करण्यात आले. 

Web Title: Independent bus for girls by Bhiwandi Agar