Fri, June 9, 2023

India Navy Chopper Accident : भारतीय नौदलाचे हेलिकॉप्टर मुंबईच्या किनार्याजवळ कोसळले; तीन जवान बचावले
Published on : 8 March 2023, 7:29 am
India Navy Chopper Accident : भारतीय नौसेनेचे एक आडव्हांस लाइट हेलिकॉप्टर बुधवारी सकाळ (८ मार्च) नियमीत उड्डाणादरम्यान सकाळी मुंबई किनार्याजवळ कोसळले. तात्काळ शोध आणि बचावामुळे नौदलाच्या गस्ती जहाजाने हेलिकॉप्टरमधील तीन क्रू सदस्यांना सुखरूप बाहेर काढले. दरम्यान भारतीय नौदलाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
गेल्या वर्षी ऑक्टोबर मध्ये देखील सेनेच्या हेलिकॉप्टरला अरुणाचल प्रदेश येथे अपघात झाला होता. ज्यामध्ये पाचही जवानांचा मृत्यू झाला होता. या जीवघेण्या अपघातानंतर, खबरदारीचा उपाय म्हणून, देशातील तीन सेवांमध्ये सेवा देणार्या सर्व ALH, ज्यांची संख्या 300 पेक्षा जास्त आहे, त्यांना सुरक्षा तपासणीसाठी ग्राउंड करण्यात आले होते.