वेधशाळेचा पोपट!; वाचा उद्याच्या अंकात विशेष

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 जुलै 2019

पण सध्या तरी हा अंदाज चुकल्याचे दिसते. मुंबईत छान श्रावणी उन पडलेले आहे. 
गेल्या आठवड्यातही असेच झाले होते. तेव्हाही अंदाज चुकला होता. त्यावेळी तर रेल्वेने ‘रविवारचे वेळापत्रक’ लावले होते. तेव्हाही अनेकांच्या रजा झाल्या, दांड्या झाल्या. यात शहराचे आर्थिक नुकसान होत आहे. घबराट पसरते आहे. हवामानशास्त्राबद्दल अधिक गैरसमज पसरत आहेत. 

वेधशाळेकडून आज अतिवृष्टीचा लाल इशारा देण्यात आला होता. नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांकडून ट्विटद्वारे करण्यात आले होते. त्यामुळे घबराट पसरलेली होती. आज अनेकांनी कामावर जाणे टाळले. विद्यार्थी शाळेला गेले नाहीत. 

पण सध्या तरी हा अंदाज चुकल्याचे दिसते. मुंबईत छान श्रावणी उन पडलेले आहे. 
गेल्या आठवड्यातही असेच झाले होते. तेव्हाही अंदाज चुकला होता. त्यावेळी तर रेल्वेने ‘रविवारचे वेळापत्रक’ लावले होते. तेव्हाही अनेकांच्या रजा झाल्या, दांड्या झाल्या. यात शहराचे आर्थिक नुकसान होत आहे. घबराट पसरते आहे. हवामानशास्त्राबद्दल अधिक गैरसमज पसरत आहेत. 

असे का होते? वेधशाळा अशा प्रकारचे रस्त्यावरील पोपट ज्योतिषासारखे अंदाज का देतात? वेधशाळेचे अंदाज लहरी हवामानाप्रमाणेच का असतात? याविषयी उद्याच्या अंकात विशेष. यामध्ये असतील हवामान तज्ज्ञ, नोकरदार, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांची मते...

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian Metrological Department prediction on rain