भारताच्या पहिल्या प्रीमिअम क्रुझ 'कर्णिका'चे उद्घाटन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 एप्रिल 2019

- 'कर्णिका'मुळे भारतीयांची मान अभिमानाने होईल ताठ.

मुंबई : भारतीयांची मान अभिमानाने ताठ होईल अशी बाब मुंबई आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनलवर काल (शुक्रवार) घडली. जलेश क्रुझेसच्या भारताच्या पहिल्या क्रुझ असलेल्या 'कर्णिका'चे विधिवत उद्घाटन झाले. भारतीय जल परिवहन उद्योगाच्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार म्हणून पाच रुपयांच्या विशेष टपाल तिकिटाचे प्रकाशन ही करण्यात आहे.

काही दिवस मुंबई ते गोवा अशा फेऱ्या मारून 'कर्णिका' 24 मे रोजी आपली पहिली आंतरराष्ट्रीय यात्रा दुबईसाठी रवाना होईल. विशेष म्हणजे श्रेयसी पूनित गोयंका यांनी 'कर्णिक'चे मातृत्व स्वीकारत जबाबदारी घेतली. याप्रसंगी देशासाठी विशेष योगदान देणाऱ्या पाच समाज धुरिनांचा त्यांच्या योगदानबद्दल सत्कार करण्यात आला असून, त्यामध्ये मिल्खा सिंग, मेरी कोम, सुष्मिता सेन, महेश भूपती, सुभाष चंद्रा आदींचा समावेश होता.

समुद्र मंथन से जन्मी हुयी अप्सरेचे नाव कर्णिक होते. याशिवाय वाराणसीचा "मनकर्णिक" हा भारतातील पहिला घाट अशी ओळख आहे. 70285 टन एवढे वजन असलेल्या आलिशान जहाजावर चार ते बारा असे मजले आहेत.

भारतातील पारंपरिक खाद्यपदार्थांची चव चाखता तर येईलच त्याचबरोबर जगातील विविध देशांमधील जगप्रसिद्ध अन्नपदार्थ ही येथे उपलब्ध आहेत. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी येथे सर्व प्रकारच्या विशेष सोयी जहाजावर आहेत. मनोरंजन आणि स्पोर्ट्सचे असंख्य चॉईस येथे उपलब्ध आहेत.

Web Title: Indias First Premium Cruz Karnika Inaugrated