भारतात अंतराळ मोहिमेचे 30 वर्षांचे नियोजन हवे - राकेश शर्मा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 डिसेंबर 2016

मुंबई - भारताचे आगामी 30 वर्षांतील अंतराळ मोहिमेचे नियोजन असले पाहिजे, असे मला वाटते. ते नियोजन अंतराळ क्षेत्राच्या वाटचालीनुसार कशा पद्धतीचे असेल हे मला माहीत नाही. मी धोरणकर्ता नाही; पण देशाच्या अंतराळ मोहिमेबाबत माझी ही भावना आहे. अंतराळ मोहिमांसाठी सर्व देशांनी एकत्रित कार्यक्रम राबवण्याची गरज आहे, असे मत भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांनी शनिवारी व्यक्त केले.

"आयआयटी'तील व्याख्यानात ते बोलत होते. 'प्रत्येक देशाने अंतराळ मोहिमेसाठी वेगवेगळा वेळ आणि पैसा खर्च करण्यापेक्षा सर्व देशांनी एकत्र येऊन अंतराळ मोहिमेसाठी विचार करण्याची आता गरज आहे. पाश्‍चिमात्य देश आणि रशियासारख्या देशांमार्फत अंतराळ मोहिमांसाठी वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत; पण आपल्याकडे असणाऱ्या स्रोतांचा असा दुरुपयोग होऊ नये,'' असेही ते म्हणाले. नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग पृथ्वीसाठी सर्व देशांनी मिळून एकत्रितपणे करणे गरजेचे आहे. 30 वर्षांत तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणावर प्रगती झाली आहे, त्यामुळे देशांनी अंतराळ मोहिमांबाबत विचार करण्याची आता गरज आहे. अंतराळ सर्वांत सुंदर आहे, असेही ते म्हणाले.

पुन्हा अंतराळ सफर आवडेल
अंतराळ मोहिमेतील प्रत्येक क्षण महत्त्वाचा होता. यानातील कामांमध्ये चालणारे प्रयोग, माहितीचे संकलन, अंतराळ स्थानकाशी संवाद यांसारख्या गोष्टींमुळे मी माझ्या कामात खूपच व्यग्र होतो. अवकाश आणि निसर्गाचे सौंदर्य मला नीट न्याहाळता आले नाही. मला पुन्हा अंतराळ मोहिमेवर जायला नक्कीच आवडेल; पण केवळ पर्यटक म्हणूनच. त्यासाठी कुणाला तरी माझे पैसे मोजावे लागतील. अंतराळ मोहीम ही खर्चिक बाब आहे. 20 दशलक्ष डॉलर इतका या मोहिमेचा खर्च आहे. इतके पैसे माझ्याकडे नक्कीच नाहीत, असेही ते गमतीने म्हणाले.

Web Title: India's space mission planning should be 30 years old