"इंडिगो'च्या विमानाचा अपघात टळला

file photo
file photo

मुंबई : मुंबई विमानतळावरून उड्डाण केलेल्या इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाच्या इंजिनात बिघाड झाल्याने शनिवारी हे विमान तत्काळ मुंबईत परत आणण्यात आले. वैमानिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळल्याचे सांगण्यात आले. मुंबईवरून अहमदाबादला जाणाऱ्या या विमानाच्या एका इंजिनात उड्डाणानंतर काही वेळेतच बिघाड झाला. वैमानिकाला बिघाड लक्षात येताच त्याने हे विमान पुन्हा मुंबई विमानतळावर आणले. वैमानिकाच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला. या विमानातील प्रवाशांना दुसऱ्या विमानातून अहमदाबादला पाठवण्यात आले. विमानाच्या एका इंजिनात बिघाड झाल्याचे लक्षात येताच वैमानिकाने निश्‍चित कार्यपद्धतीचा वापर करून विमान मुंबईत उतरवले. हे विमान तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com