इंडोनेशियाचा 73 व्या स्वातंत्र्यदिन साजरा

India
India

मुंबई : इंडोनेशियाच्या 73 व्या स्वातंत्र्यदिना निमित्त मुंबईतील मरीनड्राईव्ह येथील पंचतारांकित ट्राइडेंट हॉटेलात  आयोजीत एका भव्य समारंभात बोलताना 'भारतीयांच्या पर्यटन प्रेमाकरिता इंडोनेशिया एक उत्तम पर्याय असून आपली दोन्ही देशांची संस्कृति आणि परंपरा मिळती जुळती आहे." असे मनोगत उपस्थितांसमोर रिपब्लिक ऑफ इंडोनेशिया च्या कौंसलेट जनरल अदे सुकेन्दर यांनी व्यक्त केले.

या वेळी महाराष्ट्राचे राजशिष्टाचार विभागाचे सचिव नंदकुमार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.समारंभात भारतीय केंद्र सेवेतीलआणि राज्य सेवेतील काही उच्चपदस्य अधिकारी वर्ग,पर्यटन क्षेत्रातील उद्योजक, गुंतवणूकदार,व्यावसायिक उपस्थित होते.विशेष म्हणजे भारत आणि इंडोनेशिया या दोन्ही देशांच्या संस्कृतीचा, रीतिरिवाजांचा, अभिनय, नृत्य गायन, विविध कला आणि पर्यावरणाचा अभ्यास करणारे विद्यार्थी उपस्थित होते.

नंदकुमार आणि अदे सुकेन्दर यांनी "बाली" या बेटाच्या प्रवेशद्वाराचा सुंदरशी नक्षीकाम केलेल्या भातापासून निर्मित प्रतिकृतीचा केक कापून भारत इंडोनेशियाच्या मैत्रीपूर्णसंबंधाची वीण घटट असल्याचे दाखवून दिले.भारत  आणि इंडोनेशिया हे दोन्ही देश  एकत्र येऊन नाविन्यपूर्ण विकासासाठी कार्यरत राहतील अशी आशा नंदकुमार यांनी व्यक्त केली.या वेळी उपस्थितांनी एकमेकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला.

बाली बेटावरील नॉर्थ सुमात्रा येथील सुंदर असे तोबा लेक (तळे) पाहणे हे फारच अविस्मरणीय आनंददायी असते असे अदे सुकेन्दर म्हणाले.त्यांनी बेलीयम येथील ताजुंग केला यंग,योग्यकर्ता येथील बोराबुंडूर मंदिर,दक्षिण पूर्व सुल्विशी येथील वाकाटोबी,उत्तर मालूको येथील मोरोताई,बानेटेन येथील टांजुग,जकार्ता येथील पुलाऊ सेरेबू,ईस्ट जावा येथील बोरोमो,वेस्टनुसा टेंगगारा येथील मंदालिका येथील मोठी प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी सर्वानी यावे असा आग्रह धरला.आमच्या नैसर्गिक साधन संपत्तिचा विकास मोठ्या प्रमाणात आधुनिक तंत्रज्ञान वापरून होतोय.त्या करिता आर्थिक सहायता मिळने आणि त्यात वृद्धी होणे गरजेचे आहे.आम्ही पर्यटनाच्या गरजा लक्षात घेता सोयीकरीता हवाई मार्ग विमान सोयी सुविधा उपलब्ध करुन देत आहोत.येथे पर्यटना करिता आल्यास त्यांना पर्यटनाचा खरा अलौकिक अविस्मरणीय आनंद लूटता येईल यात काहीही शंका नाही.

समारंभात मनोरंजना करीता विविध नृत्य आविष्कार सादरकरीत इंडोनेशियन नर्तकी ललनांनी  सर्वाची मने जिंकली त्यांच बरोबर शेवटी सर्वाना एका प्रसिद्ध गाण्याच्या तालावर थिरकायल ,नृत्य करण्यास भाग पाडले.हा आनंदमयी स्वातंत्र्यदिन सोहळा उपस्थितांना खुप काही देऊन गेला. येथे उपस्थित असलेल्या ऐश्वर्या साखरे या कथ्थक नृत्यांगणा असून यांनी 3 महिने इंडोनेशियातील बाली बेटावर वास्तव्य केले आहे. त्यांनी आपले अनुभव कथन करताना सांगितले की,इंडोनेशिया हा अत्यंत सुंदर निसर्गसंप्पन देश असून येथे 13000 हुन अधिक बेटे(आयलंडस) आहेत.येथील विविध ठिकाणी लोकांच्या भाषा असुन अंदाजे 740 हुन अधिक भाषा बोलल्या जातात.या देशाचे ब्रीदवाक्य हे अनेकात्मतेत एकात्मता ( unity in diversity)हे असून एकदम साजेसे असे आहे.विविधतेने नटलेल्या येथील बेटांवरील हरित निसर्ग सौंदर्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष संपदा हे फुलांच्या वेली, फ़ळझाड़े नदया आणि पाउंडस ,उंचच वृक्ष दाट वनराई हे पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र बिंदू आहेत.इस्लामिक देश असुनही   येथील बाली याच बेटावर हिंदू संस्कृति आणि संस्कृत भाषेची पाळेमुळे आजही घटट रोवलेली आढळून येतात.बौद्धा चे तत्वज्ञान हि येथे आढळून येते.बाली बेटावरील जवळपास 90 टक्के लोक हिन्दू धर्मीय आहेत,येथे संस्कृत भाषा मुख्यत्वे बोलली जाते. प्रथमपूज्य श्रीगणेशाची येथे मुख्य आराधना करण्यात येते.येथील नाट्यगृहात तसेच आदिवासी परंपरागत नृत्य-नाट्यातुन संस्कृत विशेषत: बोलली जाते.प्रार्थनेची सुरुवात सूर्य (सविता) गायत्री मंत्राने होते.विविध कला उत्सव संस्कृति जपली जाते तसेच हिन्दू सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात.येथील लोकांकडून सदैव आनंदी राहत पाहुणचार कसा करावा हे शिकण्या सारखे आहे.काही प्रमाणात येथे बौध्दधर्मीय लोकहि पाहण्यात येतात ते पाली भाषेत संवाद साधतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com