शीनाच्या वरळीतील घरात इंद्राणीकडून राहुलला मज्जाव

शीनाच्या वरळीतील घरात इंद्राणीकडून राहुलला मज्जाव

मुंबई : शीनाच्या वरळीतील घरात एप्रिल 2012 मध्ये दोन-तीन दिवस कुणालाही विशेषत: राहुल मुखर्जी याला येण्यास मनाई करा, असे इंद्राणी मुखर्जी हिने सांगितले होते. या सोसायटीचे व्यवस्थापक एम. खेलजे यांनी विशेष सत्र न्यायालयात दिलेल्या साक्षीतून ही बाब उघड झाली. 

शीना बोरा हत्याप्रकरणी साक्षी नोंदवण्याची प्रक्रिया विशेष सत्र न्यायालयात न्या. जे. सी. जगदाळे यांच्यासमोर सुरू आहे. त्याअंतर्गत वरळीतील मार्लो को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे व्यवस्थापक एम. खेलजे यांची साक्ष नोंदवण्यात आली. पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांची दोन घरे या इमारतीत आहेत. शीना आणि मुखर्जी यांच्यातील संबंध इंद्राणी आणि पीटर या दोघांनाही आवडत नव्हते. 23 एप्रिल 2012 रोजी सोसायटीच्या कार्यालयात जात असताना आपल्याला इंद्राणीने अडवून दोन-तीन दिवस राहुल किंवा अन्य कोणालाही या फ्लॅटमध्ये पाठवू नका, अशी सूचना केली होती, असे खेलजे यांनी सरकारी वकिलांच्या प्रश्‍नांना उत्तरे देताना सांगितले. 

सरकारी दाव्यानुसार 24 एप्रिल 2012 रोजी शीनाची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह या फ्लॅटमध्ये लपवण्याचा इंद्राणीचा हेतू होता. इंद्राणीने शीनाची हत्या केल्यानंतर मृतदेह रायगडजवळील जंगलात जाळून पुरावे नष्ट केले होते. 

पीटर मुखर्जीचा वाहनचालक शामवर राय याला ऑगस्ट 2015 मध्ये अन्य प्रकरणात अटक झाली. त्यानंतर त्याने पोलिसांना दिलेल्या जबानीतून शीनाची हत्या झाल्याचे उघड झाले. ही हत्या तिची आई इंद्राणी मुखर्जी हिने केल्याचे समोर आले होते. पोलिसांनी केलेल्या तपासानंतर या प्रकरणात इंद्राणी मुखर्जी, तिचा पहिला पती संजीव खन्ना याच्यासह पीटर मुखर्जीला अटक करण्यात आली आहे. 

"राहुल आला होता' 

राहुल मुखर्जी शीनाचा शोध घेण्यासाठी 25 आणि 26 एप्रिलला आला होता, असे एम. खेलजे यांनी न्यायालयात सांगितले; परंतु इंद्राणी मुखर्जीच्या सूचनेनुसार त्याला फ्लॅटमध्ये जाण्यास मनाई केली, असे ते म्हणाले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com