इंद्राणीच्या जामिनाला सीबीआयचा विरोध

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

मुंबई - शीना बोरा हत्याकांडातील आरोपी इंद्राणी मुखर्जी हिच्या जामीन अर्जाला सीबीआयने बुधवारी (ता. 21) विशेष न्यायालयात विरोध केला.

मुंबई - शीना बोरा हत्याकांडातील आरोपी इंद्राणी मुखर्जी हिच्या जामीन अर्जाला सीबीआयने बुधवारी (ता. 21) विशेष न्यायालयात विरोध केला.

इंद्राणीच्या वडिलांचे नुकतेच आसाममध्ये निधन झाले. खटल्याच्या दरम्यान ही माहिती तिला दोन दिवसांपूर्वी देण्यात आली होती. वडिलांच्या अंतिम विधीसाठी उपस्थित राहण्याकरिता जामीन मिळावा, अशी मागणी करणारा अर्ज तिने मंगळवारी (ता. 20) न्यायालयाकडे केला होता. सीबीआयने या अर्जाला विरोध केला आहे. तसेच, इंद्राणीचा मुलगा मिखाईलनेही या अर्जाला सीबीआयकडे ई-मेलद्वारे विरोध दर्शवला आहे. इंद्राणीने गुवाहाटीला येऊ नये, कारण ती मला भेटायचा प्रयत्न करेल, त्यामुळे आमचे जीवन अस्वस्थ होईल, अशी भीती मिखाईलने व्यक्त केली आहे. विशेष न्या. पी. आर. भावके गुरुवारी (ता. 22) यावर निर्णय देण्याची शक्‍यता आहे.

Web Title: indrani bell oppose by cbi