इंद्राणीला तोंडावाटे अन्न देतात ; बेन्झोडायझेपिन औषधाचा ओवर डोस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

मुंबई: इंद्राणी मुखर्जीला तोंडावाटे अन्न द्यायला सुरवात केली. इंद्राणीला दिलेल्या सुचनांचे ती पालन करते. तिच्या प्रकृतीत सुधारणा आहे, अशी माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.डी. नणंदकर यांनी दिली. 

इंद्राणी मुखर्जी बेशुद्ध होण्याचं कारणं तिच्या शरिरात बेन्झोडायझोपिन हे औषध असल्याचं आता समोर आलं आाहे. 

इंद्राणी मुखर्जीला जे.जे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी हिंदूजा रुग्णालयात केलेल्या तिच्या युरिन चाचणीतून तिला बेन्झोडायझेपिन या औषधाचा ओवर डोस झाल्याचे समोर आले आहे. 

इंद्राणी मुखर्जीला शुक्रवारी रात्री जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी बेशुद्ध झाल्यामुळे इंद्राणीला उपचार देणारे जे.जे. रुग्णालयाच्या मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉक्टर विकार शेख यांनी षधांच्या ओवर डोसची शक्यता वर्तवली होती. 

अद्याप ओवर डोसचं कारण स्पष्ट नाही

इंद्राणीला ओवर डोस झाल्याचं स्पष्ट झालं असली तरी हा ओवर डोस कसा झाला याबाबत तुरुंग महानिरिक्षकांकडून आलेल्या रिपोर्टनंतरच खुलासा होण्याची शक्यता आहे. 

इंद्राणीला बेन्झोडायझेपिन, अॅम्ब्लोडिपिन, अॅस्पिरिन आणि अॅमिट्रिप्टीलिन ही औषधं इंद्राणी घेत होती. त्यापैकी बेन्झोडायझेपिन हे औषध 2015मध्ये सुरू करण्यात आले होते. झोप येण्यासाठी बेन्झोडायझेपिन हे औषध देण्यात येत होते. हे एक अॅण्टीडिप्रेसण्ट औषध आहे. 2015 मध्ये औषधांचा ओवर डोस झाल्यामुळे इंद्राणीला जे.जे. रुग्णालयात दाखल केले होते त्यावेळी तिला हे औषध डॉक्टरांनी दिले होते. 

Web Title: Indrani Mukharjee over dose