उद्योगपती आनंद महिंद्राही भारावले; 'त्या' दाम्पत्याला केली 4 लाखांची मदत

उद्योगपती आनंद महिंद्राही भारावले; 'त्या' दाम्पत्याला केली 4 लाखांची मदत

मुंबईः  कोरोनानं सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. मुंबईत या व्हायरसचा सर्वाधिक प्रसार झाला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसतोय. त्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. गेले तीन ते चार महिने लॉकडाऊन असल्यामुळे अनेक व्यवहार ठप्प झालेत. काहींच्या घरी परिस्थिती बिकट आहे. काही पालकांकडे मुलांची फी भरायला देखील पैसे नाहीत. अशातच या कठीण परिस्थितीत मुंबईतल्या मालाड भागात राहणाऱ्या एका दाम्पत्यानं चांगल्या माणुसकीचं उदाहरण दिलं आहे. 

या दाम्पत्यानं गरीब मुलांच्या शिक्षणांचा भारच उचलला नाही तर झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना दोन वेळेचं जेवणही पुरवलं. या कामासाठी या लोकांनी आपली 4 लाख रुपयांची सेव्हिंगस मोडली. आता या दाम्पत्याला उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी 4 लाख रुपयांची मदत केली आहे. या दाम्पत्यानं लॉकडाऊनच्या काळात 1500 लोकांसाठी रेशन्स खरेदी करण्यासाठी त्यांच्या वैयक्तिक बचतीतून पैसे खर्च केले.

फैय्याज आणि मिझगा शेख यांच्याबद्दलचं वृत्त पाहिल्यानंतर महिंद्रा यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ज्यांनी त्यांचे भविष्य निर्वाह निधीचे पैसे खर्च केले. जे त्यांनी घरासाठी बचत केले होते. उद्योगपती महिंद्रा यांच्यासह केपीएमजीचे भागीदार, टेलिकॉम कंपनीतील व्हीपी आणि आयटी कन्सल्टन्सीसह टीम लीडर यांच्यासह अनेक देणगीदारांनी अतिरिक्त दीड लाख रुपयांचे योगदान या दाम्पत्याला दिलं. 

आम्हाला मदत केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. त्यांचे आभार शब्दात व्यक्त करु शकत नसल्याचं, फैय्याज म्हणाले. 24 जुलैला वृत्तपत्रात बातमी आल्यानंतर आमच्याकडे रेशनची मागणी वाढली असून संपूर्ण मुंबईमधून आम्हाला फोन येत आहेत. मला कोणालाही नाकार द्यायची इच्छा नाही आहे. ज्या क्षणी मला निधी मिळाला. पहिल्यांदा अधिकचे रेशन खरेदी केलं असल्याचं त्यांनी सांगितलं.

मालवणीतील पाच खोल्यांमध्ये एक शाळा चालवित असलेला मिग्गा यांनी दाट लोकवस्ती असलेल्या अंबुजवाडीत शिक्षणांपासून वंचित असलेल्या मुलांच्या शिक्षणांचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला आहे. तिच्या शाळेत शिकणार्‍या एसएससीच्या सहा विद्यार्थ्यांपैकी पाच विद्यार्थी बुधवारी उत्तीर्ण झाले. मात्र त्यांच्या पालकांना आर्थिक परिस्थितीमुळे त्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात पाठवणं शक्य नाही. आम्ही त्यांचं शिक्षण सोडून देऊ शकत नसल्यानं त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयाची फी भरु, असं मिग्गा यांनी सांगितलं. 

झोपडपट्टीवासीय आणि दैनंदिन मजुरांच्या मुलांच्या शिकण्यासाठी त्यांच्या मूलभूत शिक्षणासाठी मिग्गा यांनी २०१० मध्ये मालवणीमध्ये ‘बालवाडी’पासून सुरुवात केली. काही वर्षानंतर त्यांनी झील इंग्लिश स्कूल सुरू केले. ज्या शाळेला अद्याप सरकारी मान्यता प्राप्त झालेली नाही. तसंच लॉकडाऊनच्या काळात बऱ्याच विद्यार्थ्यांच्या पालकांचे कामं ठप्प असल्यानं ते शाळेची फी भरण्यास असमर्थ आहेत. या संकटात त्यांनी आपल्या मुलांना अभ्यास आणि फीची चिंता करू नका असं सांगितलं.  त्यानंतर त्यांनी शालेय मुलांची तीन महिन्यांची फी माफ करण्याचा निर्णय घेतला.

दाम्पत्यानं अशी केली मदत

या दाम्पत्यानं घरं खरेदी करण्यासाठी बाजूला ठेवलेले चार लाख रुपये सेव्हिंगमधून काढले आणि त्यातून गरिबांना मदत केली. यानंतर या सर्व लोकांनी मालाड आणि आसपासच्या भागातील जवळपास 1500 लोकांना रेशन आणि भोजन वाटप केले. 

लोकांनी मानले आभार 

मालाडमध्ये राहणारे ऑटो ड्रायव्हर सगीर अहमद यांनी सांगितलं की, लॉकडाऊनच्या काळात माझा हात फ्रॅक्चर झाला. अशात कुटुंबात कमाई न झाल्यानं मोठं संकट समोरं होतं. अशा काळात यांनी आम्हाला बरीच मदत केली. तर मालडाच्या अंबुजवाडीमध्ये राहणाऱ्या शबाना शेख यांनी म्हटलं की, काही घरकाम करुन माझ्या कुटुंबियांचा गाडा चालवायची. मात्र लॉकडाऊनच्या काळात काम सुटलं. अशात मिग्गा यांनी आम्हाला मदत केली.

Industrialist Anand Mahindra donates 4 lakh malad Malwani couple

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com