माजी मुख्यमंत्र्यांच्या दिमतीला अजूनही माहिती आणि जनसंपर्क विभागाचे कर्मचारी

माजी मुख्यमंत्र्यांच्या दिमतीला अजूनही माहिती आणि जनसंपर्क विभागाचे कर्मचारी

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे. अशात सध्या महाराष्ट्रातील सर्व सूत्र हे राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला वर्षा बंगला सोडलेला नाही. अशातच आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल एक धक्कादायक माहिती समोर येतेय. देवेद्र फडणवीस यांच्यासाठी सरकारच्या अखत्यारीतील माहिती आणि जनसंपर्क विभागेचे सहा कर्मचारी फडणवीस यांच्या प्रसिद्धीच्या कामासाठी वर्षावर कार्यरत असल्याची माहिती आता समोर येतेय. 

भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून राज्यपालांनी आपलं संख्याबळ सादर करण्यास निमंत्रण मिळालं होतं. अशात तिन्ही पक्षांकडून आपलं संख्याबळ सादर करण्यास असमर्थता दर्शवली गेली. यानंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. दरम्यान भारतीय संविधान कायदा 356 अन्वये राष्ट्रापाई राजवटील सर्व राजकीय नियुक्त्या, मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ लगेच संपुष्टात येतो. सरकारमधील राजकीय नियुक्त्यांना दिलेल्या सवलती, नियुक्त्या, बंगले, दालनं रिक्त करावे लागतात. 

अशात अजूनही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला अजूनही रिक्त केलेला नाही. या बंगल्यावर राज्याच्या विकासाच्या दुष्टीने अनेक बैठका होतायत. अनेक जण सातत्याने देवेद्र फडणवीस यांना भेटतायत. याच बैठकांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी वर्षावर माहिती आणि जनसंपर्क कार्यालयाचे सहा कर्मचारी राबत आहेत. राष्ट्रपती राजवटीत सर्व कर्मचार्यांना मुळ विभागात पाठवलं जातं. मात्र माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या या कर्मचार्यांना वर्षावर ठेवल्याची माहिती मुख्य सचिवांच्या कार्यालयातील एका उच्च पदस्थ सूत्राकडून समोर आली आहे.       

सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार या कर्मचार्यांमध्ये २ फोटोग्राफर, २ व्हिडीओग्राफर २ उपसंपादक २ शिपाई आणि एका अधिकार्याला वर्तमान पत्रातील कात्रणं काढून ठेवण्याचं काम दिलं गेलंय. याबाबत वर्षावरील चौकशीत देखील यांची नियुक्ती माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी केल्याची माहिती समोर आलीये. 

Webtitle : information and public relation officers still working for ex cm devendra fadanavis

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com