माथाड़ी आणि मराठा मुलांना कर्ज परतावा योजनां माहिती शिबीर 

Information on the Loan Refund Schemes Information Camp for Mathadi and Maratha Boys
Information on the Loan Refund Schemes Information Camp for Mathadi and Maratha Boys

मुंबई : महाराष्ट्र शासनाने छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानाअंतर्गत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत शासनाने जाहिर केलेल्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (IR-1), गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना (IR-2), गट प्रकल्प कर्ज योजना (GL-1) या योजनांची माहिती घेऊन त्याचा लाभ माथाडी कामगार व मराठा समाजातील तरुण-तरुणींनी घ्यावा, त्यासाठी लागणारे मार्गदर्शन व सहकार्य दिले जाईल, अशी ग्वाही अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष व माथाडी कामगार नेते माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी दिली.

तर माथाडींचे दैवत स्व.अण्णासाहेब पाटील यांच्या सामाजिक कार्याचा वारसा लाभलेले माथाडी कामगार नेते व माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील हे महामंडळाच्या अध्यक्ष पदावरुन शासनाच्या योजना राबविण्याचे प्रयत्न करतील, असे आमदार निरंजन डावखरे यांनी बोलताना सांगितले.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्यावतीने आणि महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या सौजन्याने ता.09 सप्टेंबर ला माथाडी भवन, तुर्भे, नवीमुंबई याठिकाणी छत्रपती राजाराम महाराज उद्योगजकता व कौशल्य विकास अभियानाअंतर्गत शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या मार्गदर्शन शिबीरात नरेंद्र अण्णासाहेब पाटील व निरंजन डावखरे बोलत होते.

या मार्गदर्शन शिबीरास अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष व माथाडी कामगार नेते, माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील, आमदार निरंजन डावखरे, व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील, सल्लागार प्रकाश पागे, सहाय्यक संचालक छाया कुबल, उप महाव्यवस्थापक आकाश मोरे, मुंबई जिल्हा समन्वयक विशाल मोरे, ठाणे जिल्हा समन्वयक पौर्णिमा ढेंगे, बँक ऑफ इंडियाचे जिल्हा प्रबंधक गदाधर सेठी, दि नॅशनल को.ऑप.बँकेच्या तळोजा शाखेच्या व्यवस्थापक सुनिता घाडगे, उलवे शाखेचे व्यवस्थापक सचिन देसाई, प्राना फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. प्राची नरेंद्र पाटील आदी मान्यवर व अधिकारी उपस्थित होते.

या उद्योजकता मार्गदर्शन शिबीरास नवीमुंबई व इतर परिसरातून माथाडी कामगारांची तसेच मराठा समाजाचे तरुण-तरुणी बहुसंख्येने उपस्थित होती. छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानाअंतर्गत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत शासनाने जाहिर केलेल्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (IR-1),गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना (IR-2),गट प्रकल्प कर्ज योजना (GL-1) या योजनांची माहिती महामंडळाचे अधिका-यांनी दिली,महामंडळाचे सल्लागार यांनी तरुण-तरुणींच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
 प्राना फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ.प्राची नरेंद्र पाटील यांनी उद्योजकता मार्गदर्शन शिबीरातील सर्व उपस्थित मान्यवर आणि तरुण-तरुणींचे आभार व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com