गणेश नाईक यांचा आघाडीसाठी पुढाकार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 मे 2017

भिवंडी - महापालिकेच्या चौथ्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना-भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांनी पुढाकार घेतला अाहे. त्यांनी काँग्रेस, समाजवादी पक्ष, बसप आणि रिपब्लिकन पक्षाशी आघाडीची बोलणी सुरू केली आहेत. आगामी निवडणूक महाआघाडीने लढल्यास जातीयवादी पक्षांना रोखता येईल, असा विश्‍वास नाईक यांनी नुकत्याच झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा समद नगर येथे झाला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी पक्षनिरीक्षक नसीम सिद्दीकी, माजी खासदार संजीव नाईक, जिल्हाध्यक्ष शेख खालिद गुड्डू, प्रमोद हिंदुराव, महादेव चौघुले, इरफान भुरे, नगरसेवक भगवान टावरे, अनिल फडतरे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात काँग्रेसचे नेते संगीत मोमीन, माजी नगरसेवक हसमेन फारुकी, मनसेचे हमीद शेख, कामरान शेख यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

भिवंडीत विकासाच्या मुद्द्यांवर पक्ष निवडणूक लढविणार आहे. शिवसेना -भाजप पक्षाची लाट रोखण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे. त्यासाठी समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू असीम आजमी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आदी पदाधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहेड; मात्र आघाडी न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढविणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

Web Title: Initiative for Ganesh Naik's lead