बाळाच्या शरीरात इंजेक्‍शनची सुई

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जुलै 2018

मुंबई - पनवेलमध्ये 22 दिवसांपूर्वी जन्मलेल्या मुलाच्या शरीरात राहिलेली इंजेक्‍शनची सुई तब्बल 19 दिवसांनंतर काढण्यात परळच्या वाडिया रुग्णालयातील डॉक्‍टरांना यश आले आहे. या मुलाच्या डाव्या पार्श्‍वभागाच्या सांध्यांमध्ये ही दोन सेंटिमीटर लांबीची सुई अडकली होती. ही सुई तेथे कशी अडकली याबाबत पालकांना काहीच माहिती नाही.

पनवेलच्या आष्टे कुटुंबात जन्मलेल्या बाळाला काही दिवसांनी ताप येऊ लागला. त्याच्या उजव्या मांडीलाही सूज आली होती. त्याची बिघडत चाललेली तब्येत पाहून पालकांनी बालरोगतज्ज्ञांची भेट घेतली. एक्‍स रे आणि अल्ट्रासाउंड चाचणी केल्यानंतर बाळाच्या डाव्या पार्श्‍वभागाच्या सांध्यामध्ये "ऑस्टिओमायलायटिस' (संसर्ग) असल्याचे निदान झाले. तेव्हा एक्‍स-रे रिपोर्टमध्ये डाव्या पार्श्‍वभागात सांध्यावर बाहेरील वस्तू दिसून आली; मात्र ती नेमकी काय असावी हे समजण्यासाठी सिटी स्कॅन केले. त्यामध्ये लसीकरणादम्यान वापरलेली सुई शरीरात अडकल्याचे दिसून आले. त्यानंतर त्वरित डॉक्‍टरांनी शस्त्रक्रिया करून ही सुई काढून टाकली.

या बाळावर उपचार केलेल्या "वाडिया'च्या बालशल्यविशारद डॉ. प्रज्ञा बेंद्रे यांनी सांगितले, की या बाळाला "ऑस्टिओमायलायटिस' हा हाडांचा संसर्ग झाला होता. जन्माच्या तिसऱ्या दिवशी स्थानिक नर्सिंग होममध्ये त्याला स्नायूशी संबंधित लस देण्यात आली. ही सुई 19 दिवस त्याच्या शरीरात राहिली. त्याला ती टोचत नसावी किंवा वेदना व्यक्त करता येत नसाव्यात.' डॉक्‍टरांनी बाळाचा जीव वाचवला, असे त्याचे वडील सुधाकर आष्टे म्हणाले.

कशी काढली सुई?
बाळाच्या शरीरातून सुई काढण्यासाठी इन्ट्रा-ऑपरेटिव्ह शस्त्रक्रिया करण्यात आली. नेमकी जागा कळण्यासाठी "सी आर्म लोकलायझेन'चा उपयोग करण्यात आला. त्यात ही दोन सेंटिमीटरची सुई डाव्या पार्श्‍वभागाच्या सांध्याच्या प्रावरणाला चिकटल्याचे कळले.

Web Title: Injection needle in the babys body surgery

टॅग्स