ठाण्याच्या खाडीकिनारी जखमी ऑलिव्ह रिडले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

ठाणे - घोडबंदर रोड येथील फाउंटन हॉटेलजवळच्या वर्सोवा खाडीकिनारी सोमवारी ऑलिव्ह रिडले जातीचे दुर्मिळ कासव जखमी अवस्थेत आढळले.

स्थानिकांनी याबाबत प्राणिमित्रांना माहिती दिली. त्यांनी तातडीने या कासवाला ठाण्यातील "एसपीसीए' या प्राण्यांच्या रुग्णालयात दाखल केले. हे कासव कशामुळे जखमी झाले, याबाबत अद्याप कारण स्पष्ट झालेले नाही.

ऑलिव्ह रिडले जातीचे असलेल्या या कासवाचे वजन तब्बल 17 किलो आहे. कोपरी, ठाणे पूर्व ते ठाणे पश्‍चिमेकडील रेतिबंदर, साकेत, बाळकूम आणि घोडबंदर या खाडीकिनारी नेहमीच विविध जलचरांचा वावर आढळतो.

सोमवारी सकाळी नागरिकांनी जखमी समुद्री कासव पाहिले. त्याच्या पुढच्या डाव्या आणि पाठीमागच्या उजव्या पायाला दुखापत झाली होती. याबाबत नागरिकांनी तातडीने प्राणिमित्रांना कळवले. त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी कासवाला ठाण्यातील एसपीसीए या प्राण्यांच्या रुग्णालयात दाखल केले. ऑलिव्ह रिडले या प्रजातीचे हे कासव आहे.

Web Title: injured olive ridley receive