मातंग समाजावरील अन्याय थांबवा अन्यथा अंदाेलन

दिनेश चिलप मराठे
शनिवार, 23 जून 2018

मुंबादेवी : राज्यभरात ठिकठिकाणी मातंग समाजावर जे अन्याय अत्याचार सुरु अाहेत ते थांबवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा. अन्यथा या विराेधात राज्यभरात जनअांदाेलन छेडण्यात येर्इल असा इशारा शुक्रवारी मुंबर्इ मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत अण्णाभाऊ साठे यांच्या सून सावित्रीबार्इ साठे यांनी सरकार ला दिला.

जळगाव जल्ह्यातील तालुका जामनेर येथील वाकडी गावात अल्पवयीन मातंग समाजातील अल्पवयीन दाेन मुलांना विहिरीत पाेहल्याबद्दल अर्धनग्न करून संबंधित विहिर मालकांनी मारहाण केली हाेती. सदर घटना पुराेगामी महाराष्ट्राला अशाेभनीय असून समाजाला काळिमा फासणारी हाेती. या घटनेच्या राज्यभरात निषेध करण्यात अाला. पिडितांवर अत्याचार करणाऱ्या कठाेरात कठाेर शिक्षा व्हावी अशी मागणी सावित्रीबार्इ साठे यांनी यावेळी केली. तसेच लाेकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचा प्रश्न तात्काळ साेडविण्यात यावा व अण्णाभाऊ साठे महामंडळ सुरू करण्यात यावे अशी मागणीही यावेळी करण्यात अाली.

अलिकडच्या काही महिन्यांपासून ग्रामीण भागातील मातंग समाजावरील हल्ले सातत्याने वाढत असून त्याला शासनव्यवस्था जबाबदार अाहे. अनुसुचित जाती जमाती अत्याचर कायदा रद्द करून राज्य सरकारने जातीयवाद्यांना एक प्रकारे पाठबळ दिल्याचा अाराेप अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांनी यावेळी केला.

मुख्यमंत्र्यांनी त्वरित हस्तक्षेप करून मातंग समाजावर हाेत असलेले हल्ले राेखून सलाेखा निर्माण करण्यासाठी तातडीने उपाययाेजना कराव्यात. अन्यथा पुढील वर्षी हाेत असलेल्या निवडणुकीत मातंग समाज भाजपच्या विराेधात मतदान करेल असा इशारा त्यांनी दिला. मातंग समाजातील अत्याचाराने पिडित असलेल्या कुटुंबाना अाधार देण्यासाठी राज्यभरात प्रबाेधन माेर्चा काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Web Title: injustice should stop on matang community