अवनी मृत्यूप्रकरणी चौकशी समिती स्थापन

Sudhir-Mungantiwar
Sudhir-Mungantiwar

मुंबई - "अवनी' वाघीण मृत्यूप्रकरणी सखोल चौकशीसाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या आदेशानुसार प्रधान मुख्य वनसंरक्षक एस. एच. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

नरभक्षक झालेल्या अवनी वाघिणीला गेल्या शनिवारी (ता. 3) ठार मारण्यात आले होते. त्यानंतर त्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होत्या.

वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सदस्य डॉ. बिलाल हबीब, "वन्यजीव संवर्धन ट्रस्ट'चे अध्यक्ष अनिष अंधेरीया हे समितीचे सदस्य असून अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर समितीचे समन्वयक म्हणून काम पाहतील. ही समिती अवनी वाघीण मृत्यू प्रकरणात मार्गदर्शक तत्त्व तसेच स्थायी कार्यप्रणाली योग्य पद्धतीने अवलंबिली गेली किंवा नाही, याबाबत वस्तुस्थितीदर्शक चौकशी करून शासनाला आपला अहवाल सादर करणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com