शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विमा कंपन्यांची चौकशी करा - शरद पाटील

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जुलै 2018

वाडा : 2017 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे वाडा तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. या नुकसानीचे कृषी विभागाकडून पंचनामेही करण्यात आले होते. मात्र विम्याची रक्कम भरूनही विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना अद्याप विम्याची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाली आहे.

या फसवणूकीची चौकशी करून विमा कंपनीवर कठोर कारवाई करावी व शेतकऱ्यांना तत्काळ विम्याची रक्कम मिळवुन द्यावी, अशी मागणी वाडा ग्रुप वि.का.सेवा सहकारी सोसायटी ली. वाडाचे चेअरमन शरद यशवंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे लेखी निवेदनाने केली आहे.

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनामध्ये त्यांनी, वाडा सोसायटी मधील 24 गावातील 381 सभासद शेतकऱ्यांनी भरलेल्या 3 लाख 74 हजार 322 रूपये एवढ्या रक्कमेचा उल्लेख करुन 2017 मध्ये 479.90 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असल्याचे म्हटले आहे. मागील वर्षी वाडा तालुक्यामध्ये झालेल्या पावसाने पिकांचे अतोनात नुकसान केले होते. या नुकसानीची भरपाई मिळेल, असे शासनानेही जाहीर केले होते. मात्र शासनानेही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली नाही आणि विमा कंपनीनेही शेतकऱ्यांना फसविले त्यामुळे शेतकरी अडचणीत आल्याचे शरद पाटील यांनी सांगितले.

Web Title: inquiry of insurance company who deceive farmers said sharad patil