द्वेश भावना पसरविणारा व्हिडीओ व्हायरल करणारा अटकेत 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जुलै 2018

नवी मुंबई - मराठा समाजाच्या वतीने 25 जुलै रोजी पुकारण्यात आलेल्या मुंबई बंददरम्यान व्हॉट्‌सऍपवरून समाजात द्वेशभावना पसरविणारा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यास पोलिसांनी अटक केली. साजन पाटील असे या तरुणाचे नाव आहे. त्याच्या व्हिडीओमुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्‍यता निर्माण झाल्याने तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी त्याला रविवारी अटक केली. 

नवी मुंबई बंददरम्यान काही समाजकंटकांनी संधीचा फायदा उचलत कोपरखैरणेत शेकडो वाहनांची नासधूस केली. त्यामुळे कोपरखैरणेत त्याचे पडसाद उमटून दगडफेकीचे प्रकार घडले. यात पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांसह नागरिकदेखील मोठ्या संख्येने जखमी झाले. दरम्यान, कोपरखैरणेमध्ये उसळलेल्या दंगलीमध्ये तीन-चार जणांचा मृत्यू झाल्याचे संदेश सोशल मीडियावरून सातत्याने फिरत असल्याने संपूर्ण नवी मुंबईतील वातावरण तणावग्रस्त होते. अशा प्रकारचे अफवा पसरविणारे मेसेज सोशल मीडियावरून व्हायरल होत असल्याने नवी मुंबई पोलिसांनी कोपरखैरणेत उसळलेल्या दंगलीच्या घटनेनंतर संपूर्ण इंटरनेट सेवा बंद केली होती. 

त्यातच कोपरखैरणे, घणसोली परिसरात दोन गटांत धुसफूस सुरू असताना पावणे गावात राहणाऱ्या साजन पाटील याने नवी मुंबई आमची असल्याबाबतचा स्वत:चा व्हिडीओ काढून तो 26 जुलै रोजी सोशल मीडियावरून व्हायरल केला. सदर व्हिडीओ दोन समाजामध्ये द्वेषभावना निर्माण करून शत्रुत्व निर्माण करणारी असल्याचे आढळून आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. 

Web Title: Insensitive Video arrested a viral video