एमएसईबीच्या जुन्या यंत्रणा नव्याने उभारण्याचे अधिक्षक अभियंत्यांचे निर्देश

दिनेश गोगी
बुधवार, 26 जून 2019

  • निविदा प्रक्रिया सुरु करण्याच्या सूचना
  • शिवसेनेच्या मागण्या मान्य
  • शहरातील प्रमुख चौकात रास्तारोको करण्याचा इशारा

उल्हासनगर : वारंवार विद्युत पुरवठा खंडित होण्यास कारणीभूत असलेली जुनी यंत्रणा नव्याने उभारा. त्यासाठी तातडीने निविदा प्रक्रिया सुरु करा. विद्युत मंडळाच्या वतीने निधी कमी पडू दिला जाणार नाही. असे निर्देश आज मंडळाचे अधिक्षक अभियंता धर्मराज पेटकर यांनी उल्हासनगरातील कार्यकारी अभियंत्यांना दिले आहेत.

वारंवार होणाऱ्या विद्युत खंडितच्या प्रकाराच्या विरोधात शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी 22 तारखेला शहरातील प्रमुख चौकात रास्तारोको करण्याचा इशारा दिला होता. त्यावर 25 तारखेला अधिक्षक अभियंता धर्मराज पेटकर हे उल्हासनगर मध्ये येत आहेत. तेंव्हा तोडगा काढण्यात येणार असे लेखी आश्वासन पोलिस उपायुक्त प्रमोद शेवाळे, एमएसईबीचे कार्यकारी अभियंता रामराव राठोड, अशोक सावंत यांनी दिल्यावर शिवसेनेने रास्तारोको स्थगित केला होता.

आज नियोजित वेळेनुसार धर्मराज पेटकर हे उल्हासनगरात आले असता, त्यांनी शिवसेनेच्या एमएसईबी यंत्रणेच्या बाबत ज्या तकारी होत्या. त्या मान्य करताना सर्व तक्रारिंचे निवारण तात्काळ करण्यात येणार असे आश्वासन दिले यासोबतच सर्व जुनी यंत्रणा नव्याने करण्यासाठी शक्य तितक्या लवकर निविदा प्रक्रिया हाताळण्याचे निर्देश पेटकर यांनी अधिकारी रामराव राठोड, अशोक सावंत यांना दिले.यावेळी नगरसेवक सुनील सुर्वे, अरुण आशान, ग्राहक संरक्षण कक्ष शहरप्रमुख जयकुमार केणी, महिला आघाडी संघटक मनीषा भानुशाली, सिंधी सेनेचे रवि खिलनानी, विभागप्रमुख सुरेश सोनवणे आदि पदाधिकारी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Instructions of superintending engineers to revive old machinery of MSEB as newly constructed