म्हाडाच्या वसाहतींमधील प्रत्येक इमारतीच्या स्वतंत्र विकासाला परवानगी देण्या ऐवजी संपुर्ण वसाहतीचा एकत्रिक विकासाला प्राधान्य देण्याचा विचार सुरु असल्याचेही गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांनी सांगितले.एक-एक इमारतीच्या पुनर्विकासात अडचणी येत असल्याचेही त्यांनी नमुद केले.तसा प्रस्ताव म्हाडाने तत्काळ राज्य सरकारला सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
माहूलग्रस्तांचे गोराईत पुनर्वसन
माहूल येथील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन गोराई तसेच बोरीवलीत करण्यासाठी गृहनिर्माण योजनेच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या 300 घरांचा ताबा महापालिकेला देण्यात येणार आहे.माहूल मधून या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्याचे उच्च न्यायालयाने महापालिकेला दिले होते.शहरातील खासकरुन पुर्व उपनगरातील नाले रुंदीकरण,जलवाहीन्यांच्या बाजूच्या रहिवाशांचे पुनर्वसन माहूल येथे करण्यात आले होते.
ही बातमी वाचलीये का... शरद पवारांचा मिडास टच, 'त्या' झोपडीचं पक्क्या घरात होणार रूपांतर
बीआयटी चाळीमध्ये स्मारक
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेल्या परळमधील बीआयटी चाळीमध्ये स्मारक तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी ही इमारत ताब्यात घेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर राहात असताना त्यांची खोली होती त्या स्वरुपात तयार करण्यात येणार आहे.हे त्यांचे राष्ट्रीय स्मारक असेल.तर,साहित्य रत्न,लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे स्मारक घाटकोपर मधील चिरागनगर मध्ये करण्यात येईल.
Integrated development of Mhada colonies
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.