धास्ती कोरोनाची ! फोर्टिसचा ICU कक्ष फुल, किरीट सोमय्यांनी BMC कडे केली महत्त्वाची मागणी

सुमित बागुल
Monday, 22 February 2021

मुंबईत 68 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर 

मुंबई : "मास्क घाला, लॉकडाऊन टाळा", असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  कालच्या आपल्या संबोधनात म्हंटले आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन नको असल्यास कोरोनाचे नियम पाळावेच लागतील नाहीतर महाराष्ट्रात  लॉकडाऊन करावं लागेल असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. अशातही मुंबईकर नागरिक मात्र कोरोनाला अजूनही तितक्याशा गांभीर्याने घेत नाहीत.

यातच मुंबईतील रुग्णालये देखील पुन्हा एकदा कोरोना रुग्णांमुळे भरायला सुरवात झाली आहे. याच गोष्टीकडे भारतीय जनता पक्ष नेते किरीट सोमय्या यांनी लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे. किरीट सोमय्या यांनी एक ट्विट करत याकडे लक्ष वेधलं आहे. 

महत्त्वाची बातमी : महाविकास आघाडीतील नेत्यांचे दौरे आणि कार्यक्रम रद्द ! 'शिक्षण मंत्रालय @ मुंबई'ही कोरोनामुळे रद्द
 

किरीट सोमय्या यांनी ट्विट करत म्हंटले आहे की, "मुंबईतील मुलुंडमधल्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये ICU पूर्णपणे भरलं आहे. या पार्श्वभूमीवर मी फोर्टिस हॉस्पिटल आणि मुंबई महापालिकेला देखील मुंबईतील ICU रुग्णालयांची क्षमता तात्काळ वाढवण्यास सांगू इच्छितो.दरम्यान आता यावर महापालिका काही निर्णय घेते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

मुंबईत दैनंदिन रुग्णवाढ सुरूच

मुंबईत दैनंदिन रुग्णवाढ सुरूच असून कोविड रुग्णवाढीचा दर वाढून  0.20 इतका झाला आहे. काल 921 नवे रुग्ण सापडले असून एकूण रुग्णसंख्या 3 लाख 19 हजार 128 झाली आहे. काल 540 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 2 लाख 99 हजार 546 रूग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत एकूण 31 लाख 33 हजार 429 कोविड चाचण्या करण्यात आल्या.

महत्त्वाची बातमी :  मुख्यमंत्र्यांनी दिली आठ दिवसांची मुदत! मास्क घाला, शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा

मुंबईत काल 4 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. एकूण मृतांचा आकडा 11,442 इतका झाला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर हा 94 टक्के इतका झाला आहे. तर रुग्ण दुपटीचा दर खाली घसरला असून 346 दिवसांवर आला आहे.

मुंबईत 68 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 1 हजार 17 इतकी आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 7 हजार 70 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. तर कोविड काळजी केंद्र 1 मध्ये 400 अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

intensive care unite of fortis hospital mulund full kirit somayya demands increase ICU facility in mumbai


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: intensive care unite of fortis hospital mulund full kirit somayya demands increase ICU facility in mumbai