संवाद मेळावे मनसेकडून रद्द

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 एप्रिल 2017

मुंबई - महापालिका निवडणुकीत पराभूत झालेल्या मनसेच्या पुनर्बांधणी प्रक्रियेला पहिलाच झटका बसला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांतील संवाद मेळावे अचानक रद्द केले आहेत.

मुंबई - महापालिका निवडणुकीत पराभूत झालेल्या मनसेच्या पुनर्बांधणी प्रक्रियेला पहिलाच झटका बसला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांतील संवाद मेळावे अचानक रद्द केले आहेत.

एप्रिलअखेरी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी खुद्द राज मेळाव्यांना हजेरी लावतील, अशी माहिती मनसेच्या नेत्यांनी दिली होती; मात्र परवानगीशिवाय काही नेत्यांनी मेळावे घेण्याचा निर्णय घेतल्याचे समजताच राज यांनी मेळावे रद्द केल्याची चर्चा आहे. पराभवामुळे आलेले नैराश्‍य दूर करत पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी संवाद मेळावे घेणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली होती. खुद्द राज यांनी मनसेच्या वर्धापनदिनी मेळाव्याच्या माध्यमातून लवकरच आपण सर्व नेतेमंडळींसोबत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या भेटीला येणार असल्याचे सूतोवाच केले होते. त्यानुसार मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांत संवाद मेळावे होणार होते.

Web Title: Interaction rally canceled by MNS