घरातच धावून 21 किलोमीटर मॅरेथॉन केली पूर्ण, लॉकडाऊनमध्ये मॅरेथॉनमटूंच्या ग्रुपचा 'इनडोअर टास्क'चा फंडा

अनिश पाटील
Saturday, 18 April 2020

कोरनाच्या संकटामुळे जगभरातील लोक आपापल्या घरात लॉकडाऊन आहेत. पण या परिस्थितीत स्वतःला फीट ठेवण्यासाठी नवी मुंबईतील 155 मॅरेथॉनपटूंच्या ग्रुपने एकमेकांना ऑनलाईन टास्क देण्याचा नवा उपक्रम सुरू केला आहे.

मुंबई : कोरनाच्या संकटामुळे जगभरातील लोक आपापल्या घरात लॉकडाऊन आहेत. पण या परिस्थितीत स्वतःला फीट ठेवण्यासाठी नवी मुंबईतील 155 मॅरेथॉनपटूंच्या ग्रुपने एकमेकांना ऑनलाईन टास्क देण्याचा नवा उपक्रम सुरू केला आहे. त्या अंतर्गत दररोज इनडोअर रनिंग, सुर्यनमस्कार, पुशअप्स, जंम्पिंग जॅक्स सारखे टास्क दिले जातात. या प्रत्येक टास्कमधील विजेत्यांचा लॉकडाऊननंतर  सत्कार केला जाणार आहे. त्यामुळे कोरोना संकटाच्या या वाईट प्रसंगीही या मरेथॉनपटूंचे कुटुंब आनंदाचे काही क्षण दररोज अनुभवत आहेत.

मोठी बातमी - काय 20 एप्रिलनंतर घरपोच मद्य विक्री? एक मिनिट, आधी ही बातमी वाचा... 

लॉकडाऊननंतरही अनेक फिटनेसप्रेमी जॉगिंग अथवा मर्निंगवॉकसाठी बाहेर पडत होते. मॉर्निंगवॉकसाठी बाहेर पडलेल्या पुणे, मुंबईतील पेडररोड परिसरातील काही व्यक्तींवर पोलिसांनी कारवाई केली होती. त्यामुळे आपल्या ग्रुपमधल्या व्यक्तींना घरातच सक्रिय कसे ठेवता येईल, यावर या फुरिअस रनिंग कल्चर फाऊंडेशन (एफआरसीएफ) ग्रुपने काम करण्यास सुरूवात केली. त्यानुसार 155 मॅरेथॉनपटुंच्या या ग्रुपमधील कोअर कमिटीतील आठ सदस्यांनी इनडोअर टास्क सर्वांना देण्याचा निर्णय घेतला. ग्रुपमधल्या प्रत्येक मॅरेथॉनपटूला त्याची क्षमता व नजीकच्या काळातील त्याचा सराव यानुसार टास्क देण्यास सुरूवात करण्यात आली. हे सर्व टास्क जीपीएस यंत्रणेद्वारे तपासणी जातात. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळातही155 मॅरेथॉनपटूंना घरातच अॅक्टीव्ह ठेवण्याचा अनोखा उपक्रम या ग्रुपने अस्तित्त्वात आणला आहे. ग्रुपच्या अध्यक्ष मिनल रॉय या सर्व अॅक्टीव्हीटीवर बारीक लक्ष ठेऊन असतात.

मोठी बातमी -  तुमची कार व्हायरसला संपवणार! 

फिटनेसने आम्हाला सर्वांना एकत्र आणले, पण कोरोनाच्या संकटामध्ये आमचे सामाजिक दायित्त्वही आहे. त्यामुळे 155 व्यक्तींना घरातच ठेऊन कसे अॅक्टीव्ह ठेवता येईल, या संकल्पनेतून हे इनडोअर टास्कची क्लृप्ती अस्तित्त्वात आणल्याचे ग्रुपचे प्रवक्ते सोमेश्वर अहेर यांनी सांगितले. या मॅरेथॉनपटूंच्या ग्रुपमध्ये वाशी, खारघर, उल्वे, बेलापूर व नेरूळ येथील मॅरेथॉनपटूंचा समावेश आहे.  आता या ग्रुपने 1 मेचे औचित्य साधून 5 किमी, 10 किमी व 21किमी इनडोअर मॅरेथॉनचे आयोजन केले आहे. फआरसीएफ धर्मादाय नोंदणी केलेली नवी मंबईतील मॅरेथॉन पटुंची पहिला संस्था आहे.

घरातच धावून 21 किलोमीटर मॅरेथॉन पूर्ण केली : 

सोमेश्वर अहेर, खारघर (घरातच धावून 21 किलोमीटर मॅरेथॉन पूर्ण केली)
बरेच दिवस झाले, मला कुठले मॅरेथॉनचे मेडल मिळत नाही, म्हणून माझी मुलगी विचारणार करत होती. मी घरातच पाच-दहा किलोमीटर धावत होतो. पण त्यादिवशी मुलीच्या बोलण्याने सोमेश्वर यांनी रविवारी घरातच हाफ डिस्टंन्स मॅरेथॉन म्हणजेच 21 किलोमीटरचे अंतर पूर्ण केले. त्यामुळे सोमेश्वर यांच्या मनात एक वेगळा आत्मविश्वास निर्णाण झाला. त्यांनी हा टास्क पूर्ण केल्यामुळे घरातील व्यक्तींमध्येही आनंदाचे वातावरण होते. बाहेर एवढी निगेटीव्हीटी असताना या टास्कमुळे घरातले वातावरण पूर्णपणे बदलून गेले असे सोमेश्वर सांगतात.

लॉकडाऊनच्या काळात ग्रुपचे टास्क घरातच राहून करतायत पूर्ण : 

Image may contain: 2 people, people standing and indoor

तानाजी पाटील यांनी भारतीय सेनेच्या माध्यमातून 20 वर्ष देशसेवा केली. तेथे व्यायामाची सवय होती. पण सेवानिवृत्त झाल्यानंतर बारीकसारीक आजार होऊ लागले. त्या मुळे पुन्हा फिटनेसकडे लक्ष द्यायच्या उद्देशाने सुरूवात केली. पण सध्या लॉकडाऊनच्या काळात ग्रुपचे टास्क घरातच राहून पूर्ण करत आहेत.  

एकमेकांना मिळणारं प्रोत्साहन शारीरिक व्यायामाला खूप सोपं बनवते : 

Image may contain: 1 person, standing

सद्या जगभरात  कोरोनाच्या संकटाने   जगभरात थैमान घातले असून,सगळे देश याचा सामना करत आहेत.भारता सहीत अनेक देश कोरोना मुळे लॉकडाऊन आहेत़़, लॉकडाऊन च्या काळात बाहेर न पडता वर्कआऊट करण्यासाठी एफआरसीएफ आग्रही असते. म्हणून घरीच व्यायाम करत आहोत. या टास्कमुळे एकमेकांना मिळणारं प्रोत्साहन शारीरिक व्यायामाला खूप सोपं आणि मजेशीर बनवते. २ बेडरूम फ्लॅटमध्ये धावणे व व्यायाम करणे हा याचाच एक भाग आहे.

interesting story with real experiences of people who are doing workout at home in lockdown 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: interesting story with real experiences of people who are doing workout at home in lockdown