मोखाड्यातील भाजपचे अंतर्गत वाद शमले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 जून 2018

पालघर लोकसभा पोटनिवडणूकीत, मोखाड्यातील प्रतिष्ठेच्या सायदे जिल्हा परिषद गटात वरिष्ठांनी दुर्लक्ष केल्यामुळे, भाजपला पिछाडी मिळाली असल्याचा आरोप करीत, भाजप च्या 39 पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी सामुहिक राजीनामे दिले होते. त्यामुळे खळबळ उडाली होती. पक्षांतर्गत वाद मिटविण्यासाठी भाजप पालघर जिल्हाध्यक्ष आमदार पास्कल धनारे यांनी तातडीने खोडाळ्यात कार्यकर्त्यांची बैठक घेऊन यशस्वी मध्यस्थी केली आहे. त्यामुळे सर्वच नाराज पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी आपले राजीनामे मागे घेतले असून, पक्षांतर्गत पेल्यातील वादळ शमले आहे.

मोखाडा - पालघर लोकसभा पोटनिवडणूकीत, मोखाड्यातील प्रतिष्ठेच्या सायदे जिल्हा परिषद गटात वरिष्ठांनी दुर्लक्ष केल्यामुळे, भाजपला पिछाडी मिळाली असल्याचा आरोप करीत, भाजप च्या 39 पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी सामुहिक राजीनामे दिले होते. त्यामुळे खळबळ उडाली होती. पक्षांतर्गत वाद मिटविण्यासाठी भाजप पालघर जिल्हाध्यक्ष आमदार पास्कल धनारे यांनी तातडीने खोडाळ्यात कार्यकर्त्यांची बैठक घेऊन यशस्वी मध्यस्थी केली आहे. त्यामुळे सर्वच नाराज पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी आपले राजीनामे मागे घेतले असून, पक्षांतर्गत पेल्यातील वादळ शमले आहे.

मोखाड्यात भाजप मध्ये अंतर्गत वाद ऊफाळून आला होता. सायदे जिल्हा परिषद गटातील भाजपच्या पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी बंडाचा झेंडा ऊभारत, तालुका स्तरावरील वरिष्ठ नेत्यांवर, पालघर लोकसभा पोटनिवडणूकीत सायदे जिल्हा परिषद गटात दुर्लक्ष केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे भाजपचे वर्चस्व असुन ही या गटात पालघर लोकसभा पोटनिवडणूकीत पिछाडीवर रहावे लागल्याचा, आरोप कार्यकर्त्यांनी केला होता. तसेच या गटातील 39 पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी सामुहिक राजीनामे जिल्हाध्यक्ष आमदार पास्कल धनारे यांच्या कडे सुपूर्द केले होते. त्यामुळे जिल्हयात खळबळ उडाली होती. या घटनेची तातडीने दखल घेत, पास्कल धनारे यांनी खोडाळ्यात कार्यकर्त्यांची बैठक घेऊन, त्यांची नाराजी आणि गैरसमज दूर केले आहे. आता सर्व नाराज पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी आपले राजीनामे परत घेतले आहेत. त्यामुळे भाजपमधील वाद आता निवळला आहे. या बैठकीस भाजप प्रदेश कार्यकारीनी सदस्य अॅड. देविदास पाटील यांच्या सहतालुका सरचिटणीस नामदेव पाटील, ऊमेश येलमामे, हनुमंत पादीर, पप्पू येलमामे यांसह युवामोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: The internal dispute of the BJP in the Mokhanda got settled