'या' जिल्ह्याकरिता अंतर्गत 'एसटी' बससेवा सुरू

bus
bus

अलिबाग : राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आंतरजिल्हा प्रवासासाठी सोशल डिस्टंन्सिंग व काही अटी-शर्तींच्या अधीन राहून बस सुरू केल्या आहेत. महाड, पनवेल, अलिबाग, पेण, नागोठणे, खोपोली, पाली, श्रीवर्धन, बोर्ली, माणगाव, कर्जत या आगारांमधून आंतरजिल्हा प्रवास करावयाचा असल्यास नजीकच्या आगारामार्फत बस सोडण्याची व्यवस्था केली आहे.

लॉकडाऊनदरम्यान एसटीची आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक बंद होती. ही सेवा आता काही निवडक मार्गांवर सुरू करण्यात येत आहे. नियमित प्रवास करणाऱ्यांना या सेवेने मोठा दिलासा मिळणार आहे. प्रवास करणाऱ्या व्यक्तीकडे आंतरजिल्हा प्रवासाचा पास व आधार कार्ड असणे अनिवार्य आहे.

अधिक माहितीसाठी प्रवाशांनी नजीकच्या आगारातील व्यवस्थापकांशी संपर्क साधण्याचे आवाहन रायगड राज्य परिवहन विभागाच्या नियंत्रक अनघा बारटक्के यांनी केले आहे.

Internal ST bus service started for raigad district read full story

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com